मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिकच्या ३ तरुणांचा सोलापुरात अपघाती मृत्यू, ५ जखमी

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिकच्या ३ तरुणांचा सोलापुरात अपघाती मृत्यू, ५ जखमी

Mar 22, 2023, 12:40 AM IST

  • सोलापूर-तुळजापूर मार्गावर तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर तामलवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. सर्व तरुण नाशिक जिल्ह्यातील एकाच गावातील आहेत.

सांकेतिक छायाचित्र

सोलापूर-तुळजापूर मार्गावर तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर तामलवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. सर्व तरुण नाशिक जिल्ह्यातील एकाच गावातील आहेत.

  • सोलापूर-तुळजापूर मार्गावर तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर तामलवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. सर्व तरुण नाशिक जिल्ह्यातील एकाच गावातील आहेत.

सोलापूर-तुळजापूर मार्गावर तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर तामलवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त तरुण तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी नाशिकहून आले होते. तुळजापूरकडे जात असताना तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला व यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निखील रामदास सानप (वय २१), अनिकेत बाळासाहेब भाबड (वय २२) आणि अथर्व शशिकांत खैरनार (वय २२, तिघे रा. चास, ता.सिन्नर, जि. नाशिक) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर गणेश नामदेव खैरनार (वय ३२), पंकज रवींद्र खैरनार (वय ३०), जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बीडकर (वय २२) आणि दीपक बीडकर (वय २६, सर्व रा. चास, ता. सिन्नर) अशी जखमींची नावे आहे. जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातग्रस्त तरुण सिन्नर तालुक्यातील चास या गावातील आहे. सर्वजण एकाच गावातील असून ते देवदर्शनासाठी पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर व अक्कलकोटला जात होते. सोलापुरातून तुळजापूरला जाण्यासाठी सर्वजण बोलेरो गाडीतून (एमएच १५ ईएक्स ३२११) प्रवास करीत होते. सकाळी सोलापुरातून तुळजापूरकडे निघाल्यानंतर तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर तामलवाडीजवळ त्यांच्या गाडीचे टायर फुटले आणि भरधाव गाडी अनियंत्रित होऊन पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात हलवले.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा