मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेची महिला आमदार का उतरली बंडात? Video पोस्ट करून सांगितलं कारण…

शिवसेनेची महिला आमदार का उतरली बंडात? Video पोस्ट करून सांगितलं कारण…

Jun 24, 2022, 08:02 PM IST

    • मुंबईतील भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करून आपण बंड का केलं याविषयी आपल्या भावना मांडल्या आहेत.
Yamini Jadhav, Shivsena MLA

मुंबईतील भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करून आपण बंड का केलं याविषयी आपल्या भावना मांडल्या आहेत.

    • मुंबईतील भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करून आपण बंड का केलं याविषयी आपल्या भावना मांडल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाळीनंतर ४० पेक्षा जास्त आमदार गुवाहाटीत गेले तीन दिवस मुक्कामी आहेत. या राजकीय महानाट्यात सामिल झालेल्या शिवसेना आमदारांपैकी काही आमदार आता हळूहळू व्यक्त होताना दिसतोय. औरंगाबाद पश्चिम चे आमदार शिरसाठ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल, गुरूवारी पत्र लिहून बंड करण्यामागचे कारण लिहिले होते. आज मुंबईतील भायखळा येथील आमदार यामिनी यशवंत जाधव (Yamini Jadhav) यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करून आपल्या भावना मांडल्या आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार जाधव यांनी शिवसेनेची साथ सोडल्याची कारणं मांडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

यामिनी जाधव या व्हिडिओत सांगतात, ‘गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे शिवसैनिकांचा झालेला उद्रेक मी नक्कीच समजू शकते. कारण मी अजूनही शिवसैनिक आहे. यापुढेही शिवसैनिक म्हणून राहणार आहे. हे जगसुद्धा मी शिवसैनिक म्हणूनच सोडणार आहे. (पती) यशवंत जाधव हे गेले ४३ वर्ष शिवसैनिक आहेत. आमच्यासमोर अनेक अडचणी आल्या, आर्थिक समस्या उदभवल्या, निवडणुका हरलो पण कधीही यशवंत जाधव यांनी शिवसेनेबाबत वेगळा विचार कधी केला नाही. गेल्या ऑक्टोबर महिन्यात मला कॅंसरचं निदान झालं. माझ्या आयुष्यात मोठं वादळ आलं. कँसर या शब्दाने मी कोलमडून गेले होते. कुटुंबीयांनी, मतदारसंघातील शिवसैनिकांनी आम्हाला खूप मदत केली. कँसर झाल्याची माहिती यशवंत जाधव यांनी पक्षाच्या नेत्यांना दिली होती. महिला आमदार म्हणून माझी अपेक्षा होती की माझ्या घरी काही नेते येतील. पण तसं झालं नाही.

किशोरी पेडणेकरांनी आल्या, दोन तास बसल्या

तत्कालीन मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडनेकर यांनी मला मदत केल्याची माहिती यामिनी जाधव यांनी या व्हिडिओतून दिली. किशोरी ताई माझ्या घरी आल्या. दोन तास बसल्या. कँसरबाबतीच्या सूचना त्यांनी दिल्या. अध्यात्मिक सूचना दिल्या. पण ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्यापैकी एकाही नेत्याने मला संपर्क केला नाही. ही गोष्ट मला खलत होती. गेल्या सात आठ महिन्यांपासून आमचं कुटुंब अनेक अडचणींमधून जात आहे. त्यावेळीही कुणाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं नाही. आम्ही दोघेच कुटुंबासाठी हातपाय मारत राहिलो. मग या निर्णयाला येऊन पोहोचलो, असं मत यामिनी जाधव यांनी मांडलं.

जाधव यांच्यामागे ईडी, इन्कम टॅक्स चौकशी ससेमिरा

यामिनी जाधव या मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती व शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. काही महिन्यांपूर्वी यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकून तब्बल तीन दिवस घराची झडती घेतली होती. जाधव यांनी गेल्या काही वर्षांत घेतलेल्या मालमत्ता व इतर संपत्तीवरून बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा ठपका ठेवत चौकशी सुरू केली आहे. जाधव यांच्या मालकीच्या काही संपत्तींवर टाच आणली गेली आहे. यशवंत जाधव हे ‘मातोश्री’चे अतिशय निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे यामिनी जाधव शिंदे गटात सामिल झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.