मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /   पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेचा मोठा निर्णय; महाआघाडीतून बाहेर पडण्यास तयार, पण…

पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेचा मोठा निर्णय; महाआघाडीतून बाहेर पडण्यास तयार, पण…

Jun 23, 2022, 03:19 PM IST

    • Sanjay Raut Ultimatum to Rebellion: येत्या २४ तासांत मुंबईत परत या, उद्धव ठाकरेंशी बोला. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करेल, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना केलं आहे.
Maha Vikas Aghadi

Sanjay Raut Ultimatum to Rebellion: येत्या २४ तासांत मुंबईत परत या, उद्धव ठाकरेंशी बोला. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करेल, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना केलं आहे.

    • Sanjay Raut Ultimatum to Rebellion: येत्या २४ तासांत मुंबईत परत या, उद्धव ठाकरेंशी बोला. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करेल, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना केलं आहे.

Sanjay Raut appeals Shiv Sena Rebellion: पक्ष फुटीपासून वाचवण्यासाठी मुख्यमंत्रिपद व शिवसेनेचं पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी काल उद्धव ठाकरे यांनी दाखवल्यानंतर आज शिवसेनेनं पुढचं पाऊल टाकलं. शिवसेनेच्या नाराज आमदारांना काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ नको असेल तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहोत. पण बंडखोरांनी २४ तासांत मुंबईत यावं आणि पक्षप्रमुखांशी बोलावं, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केलं.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Lohagav News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकवल्यानंतर काही आमदारांना सुरतमध्ये नेण्यात आलं होतं. तिथून त्यांना गुवाहाटीला हलवण्यात आलं. पक्षाच्या विरोधात काहीतरी सुरू असल्याचं लक्षात आल्यावर बंडखोर आमदारांपैकी नितीन देशमुख व कैलास पाटील यांनी तिथून पळ काढला होता. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांना आलेला थरारक अनुभव सांगितला. कुठलीही कल्पना न देता एकनाथ शिंदे यांनी आम्हाला गुजरातमध्ये नेलं होतं. आम्हाला ते न पटल्यामुळं आम्ही तिथून कसेबसे निसटलो. आमच्यासारखे असे अनेक आमदार तिथं अडकून पडले असावेत, असं या दोन्ही आमदारांनी सांगितलं. हे सगळं भाजपचं कारस्थान आहे. त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. परत या, अशी विनंतीही त्यांनी आपल्या सहकारी आमदारांना केली.

कैलास पाटील व नितीन देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधल्यावर संजय राऊत यांनी महत्त्वाचं विधान केलं. ‘काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत सरकार नको अशी नाराज आमदारांची भूमिका आहे असं आम्हाला कळतंय. त्यांच्या भूमिकेवर विचार करण्याची पक्षाची तयारी आहे. नक्कीच विचार होईल. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे. फक्त महाराष्ट्राबाहेर जाऊन मेसेज आणि पत्रापत्री करून हे होणार नाही. आमदारांनी मुंबईत, महाराष्ट्रात यावं आणि पक्षप्रमुखांशी बोलावं, असं संजय राऊत म्हणाले. 'भाजपच्या ताब्यात असलेल्या आमदारांपैकी २१ आमदारांशी आमचा संपर्क झाला आहे. इतरही आमदारांशी संपर्क होईल, असंही राऊत यांनी सांगितलं.