मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena Revolt Live: शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत - अजित पवार

Ajit Pawar

Shiv Sena Revolt Live: शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत - अजित पवार

  • Maharashtra Political Crisis Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादानंतरही शिवसेनेचे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत आहे. यामुळं महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. जाणून घेऊया प्रत्येक घडामोड…

Thu, 23 Jun 2022 7:03 PM

Ajit Pawar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे लपून छपून काही करणार नाहीत असा माझा अनुभव आहे - अजित पवार

एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे खुद्द उद्धव ठाकरे हेच असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, 'मी गेल्या अडीच वर्षांपासून त्यांच्या सोबत काम करतोय. पाठीमागून काही करण्याची त्यांची पद्धत नाही. काही करायचं असेल तर ते स्वत: समोरून सांगतील.'

Thu, 23 Jun 2022 7:03 PM

Ajit Pawar on Maharashtra Political Crisis: भाजपचा थेट संबंध अजून तरी दिसलेला नाही - अजित पवार

भारतीय जनता पक्षाचा कुठलाही मोठा नेता अजूनही समोर आलेला नाही. त्यामुळं शिवसेनेतील बंडामागे भाजपचा हात आहे असं आता म्हणता येणार नाही - अजित पवार 

Thu, 23 Jun 2022 6:50 PM

Ajit Pawar on Maharashtra Political Crisis: निधी देताना संबंधित मतदारसंघातील आमदाराला डिस्टर्ब करण्याचा हेतू नव्हता - अजित पवार

१७० आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार आलं. उद्धव ठाकरे हे सरकारचे प्रमुख होते. ज्या मतदारसंघात जो पक्ष असेल, तिथं त्या पक्षाला डिस्टर्ब करायचं नाही. मात्र, जिथं आमदार एका पक्षाचा आणि नगरपालिका दुसऱ्या पक्षाची होती, तिथं काहीतरी गडबड झाली असू शकते. पण आमदारांना त्रास देण्याचा हेतू नव्हता - अजित पवार 

Thu, 23 Jun 2022 6:50 PM

Ajit Pawar on Maharashtra Political Crisis: विकास कामांसाठी निधी देताना मी कधीच दुजाभाव केलेला नाही - अजित पवार

अडीच वर्षांपूर्वी सरकार आलं तेव्हा ३६ पालकमंत्री नेमले, ते विशिष्ट सूत्रानुसार नेमले. विकास निधी देताना कुठंही काटछाट केली गेली नाही. कधी दुजाभाव केला नाही. सर्वच आमदारांना विकासकामांमध्ये मदत करण्याची भूमिका माझी असते. आमचे काही मित्र पक्ष वेगवेगळी विधानं करत आहेत. त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती तर बरं झालं असतं - अजित पवार

Thu, 23 Jun 2022 6:50 PM

Ajit Pawar on Maharashtra Political Crisis: अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू

राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा देऊन हे सरकार कसं टिकेल यासाठी प्रयत्न केला जाईल. मी स्वत: दुपारी मुख्यमंत्र्यांशी बोललोय. शिवसेनेतील प्रश्नांबद्दल त्यांचे नेते सांगतील. काही आमदार परतले आहेत. त्यांनी वेगळी भूमिका मांडलीय. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. - अजित पवार

Thu, 23 Jun 2022 6:29 PM

महाराष्ट्रातील सध्याची अस्थिरता आणि हे महाभारत भाजपनं घडवलंय - नाना पटोले

ईडीची दहशत माजवून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचं राजकारण आणि हे राजकीय महाभारत भाजपनं घडवलंय. आता त्यांचे नेते लपून बसलेत. पण त्यांचं हे कारस्थान यशस्वी होणारन नाही. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. वेळ पडल्यास शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यास काँग्रेस तयार - नाना पटोले

Thu, 23 Jun 2022 4:13 PM

Maharashtra Political Crisis live: अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपलं संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी अपक्षांना भाजपमध्ये अधिकृत प्रवेश दिला जात आहे. अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Thu, 23 Jun 2022 4:12 PM

Nitin Deshmukh: नितीन देशमुख पळून गेलेले नाहीत. त्यांना चार्टर्ड विमानानं पाठवलं; एकनाथ शिंदे गटाचा दावा

नितीन देशमुख पळून वगैरे गेलेले नाहीत. त्यांना चार्टर्ड विमानानं नागपूरमध्ये सोडण्यात आलं होतं, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटानं केला आहे. तसे फोटोही त्यांच्याकडून प्रसिद्ध केले गेले आहेत.

Thu, 23 Jun 2022 4:12 PM

Sanjay Pandey Meets Uddhav Thackeray: मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

Thu, 23 Jun 2022 4:12 PM

Nana Patole on Shiv Sena Revolt: आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत - नाना पटोले

महाविकास आघाडी म्हणून आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. त्यांना बाहेर पडायचं असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. त्याला आमची हरकत नाही. आम्ही विरोधात बसायला तयार आहोत, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Thu, 23 Jun 2022 3:24 PM

Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात यावं. मागणी शिवसेना पक्षप्रमुखांपुढं मांडा - संजय राऊत

महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं आहे तर ठीक आहे. तुम्ही महाराष्ट्रात या. शिवसेना पक्षप्रमुखांना भेटा. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. २४ तासांत परत या. तुमच्या भूमिकेचा विचार करू - संजय राऊत

Thu, 23 Jun 2022 3:24 PM

Shiv Sena Revolt Live: नितीन देशमुख यांचं देशातील मीडियाला आवाहन, स्वत:च्या प्रतिमेचा विचार करा!

मीडियाची प्रतिमा वाईट झाली आहे. गावखेड्यातही लोक चर्चा करतात. भाजपनं मीडियातल्या प्रमुख लोकांना खरेदी केलं आहे असं लोक म्हणतात. याचाही विचार करा - नितीन देशमुख

Thu, 23 Jun 2022 3:24 PM

Shiv Sena Revolt Live: भाजपच्या आमिषाला बळी पडू नका; आमदार नितीन देशमुख यांची सहकारी आमदारांना हाक

मी आमदार असलो तरी माझ्या मागे माझे शिवसैनिक, पदाधिकारी आहेत. मी बंडखोर आमदारांना विनंती करतो. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. कार्यकर्त्यांचा, मतदारांचा विचार करा. शिंदे साहेब तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करतेय. बळी पडू नका - नितीन देशमुख

Thu, 23 Jun 2022 3:23 PM

Shiv Sena Revolt Live: भाजप कुठल्या पद्धतीनं कारस्थान रचतंय हे माझ्या अवस्थेवरून महाराष्ट्राला कळेल - नितीन देशमुख

सुरतमध्ये फाइव्ह स्टार हॉटेल होतं. तिथं साडेतीनशे पोलीस होते. अनेक आयपीएस अधिकारी होते. हे अधिकारी भाजपची गुलामगिरी करत होते. त्यांच्याशी माझा वादही झाला. हॉटेलात गेल्यावर प्रकाश आबिटकर सुद्धा गायब झालेले दिसले. मला आनंद झाला. मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं मला इथून जायचं आहे. त्यांनी टाळाटाळ केली. पण मी तिथून निघालो, माझ्या मागे शेकडो पोलीस होते. रात्री साडेबारा ते तीन दरम्यान मी चालत होतो. मोबाइल बॅटरी डाउन होती. सावंत, नाईक यांच्याशी संपर्क केला. तिथला लँडमार्क सांगितला. माझं संभाषण गुजरातचे पोलीसही ऐकत होते. तिथं पोलिसांना मला पकडलं आणि सरकारी रुग्णालयात नेलं. मला कुठलाही त्रास नव्हता. मी डॉक्टरांना सांगत होतो मला अजिबात तपासू नका. मात्र पोलीस आणि डॉक्टरांच्या चर्चेतून मला शंका आली. नंतर डॉक्टर म्हणाला मला हार्ट अॅटॅक आला. तेव्हा मला शंका आली की माझा घातपात करण्याचा प्रयत्न आहे. मी तीन तास कोणाला अंगाला हात लावू दिला नाही. नंतर बळजबरी करून माझ्या हातावर इंजेक्शन दिलं. मला कुटुंबाची आठवण झाली. मला अश्रू अनावर झाले होते. भाजप कशा पद्धतीनं कटकारस्थान करतंय हे यातून दिसून आलं - नितीन देशमुख 

Thu, 23 Jun 2022 3:24 PM

Shiv Sena Revolt Live: चिंतामण वनगा यांच्याकडं चाललोय असं सांगून भलतीकडंच नेलं - नितीन देशमुख

गुजरातच्या दिशेनं नेलं जात असताना एकनाथ शिंदे व काही मंत्र्यांची फोनाफोनी सुरू होती. आमच्यासोबतच्या अनेक आमदारांना याची माहिती नव्हती - नितीन देशमुख

Thu, 23 Jun 2022 3:24 PM

Shiv Sena Revolt Live: ज्या पद्धतीनं मला फसवून आणि जबरदस्तीनं नेण्यात आलं, तसंच अनेकांना नेण्यात आलं असावं असं मला वाटतं - कैलास पाटील

बालाजी कल्याणकरांचा फोन मला आला होता. पण तो कट झाला. त्यांच्यासारख्या अनेक आमदारांना जबरदस्तीनं डांबलेलं असावं असं मला वाटतं - कैलास पाटील

Thu, 23 Jun 2022 3:24 PM

Shiv Sena Revolt Live: काहीही न सांगता आम्हाला गाडीत घालून नेण्यात आलं - कैलास पाटील

विधान परिषदेचं मतदान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर बोलावण्यात आलं. आम्ही नियमित त्यांना भेटत असतो. तिथं गेल्या सांगितलं गेलं की आपल्याला एका ठिकाणी जायचंय. नंतर ठाण्यातील महापौर बंगल्यावर नेलं गेलं. तिथून दोन गाड्या घेऊन ठाणे, वसई विरारनंतर पुढं गेल्या. नंतर काहीतरी वेगळं घडत असल्याचा संशय आला. आपण चुकीच्या मार्गानं जातोय असं मला वाटलं - कैलास पाटील

Thu, 23 Jun 2022 2:23 PM

Shivsena Press Conference: शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख व कैलास पाटील यांची पत्रकार परिषद सुरू

एकनाथ शिंदे गटाला सोडून आलेले आमदार नितीन देशमुख व कैलास पाटील यांची पत्रकार परिषद सुरू

Thu, 23 Jun 2022 12:22 PM

Jayant Patil on Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा मला अभिमान - जयंत पाटील

आज शिवसेनेचे काही आमदार म्हणतायत, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको. खरंतर, राष्ट्रवादीच्या आमदारांचीही काही कामं झाली नसतील. पण राष्ट्रवादीच्या आमदारांनी कधी तक्रार केली नाही. पवार साहेबांनी हे सरकार स्थापन केलंय याची जाणीव आमच्या आमदारांना होती. त्यामुळं त्यांनी कधीच तक्रार केली नाही. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो - जयंत पाटील

Thu, 23 Jun 2022 12:20 PM

Jayant Patil on Maharashtra Political Crisis: अजित पवार यांचाही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा आहे - जयंत पाटील

शिवसेनेतील अंतर्गत प्रश्नावर अजित पवार काय बोलणार? मी पक्षाची भूमिका मांडतो आहे. तीच भूमिका अजित पवारांची आहे. अजित पवार यांचाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा आहे - जयंत पाटील

Thu, 23 Jun 2022 12:20 PM

Jayant Patil: भाजपची भूमिका थेट पुढं आलेली नाही. पण आम्ही बोलणार नाही. मीडियाच ही माहिती देईल - जयंत पाटील

एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप आहे का हे अद्याप पुढं आलेलं नाही. विमानं, हॉटेलं कुणी पुरवली यात आम्ही जाणार नाही. त्यावर आम्ही बोलणारही नाही. मीडियाच आम्हाला आणि जनतेला ही माहिती देईल - जयंत पाटील

Thu, 23 Jun 2022 11:11 AM

दबावामुळं पक्ष सोडणारे बाळासाहेबांचे भक्त असू शकत नाहीत - संजय राऊत

ईडीच्या दबावाला व आमिषाला बळी पडून पक्ष सोडणारे बाळासाहेबांचे भक्त असू शकत नाही. माझ्यावरही ईडीचा दबाव आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. आमच्या आणखी एका नेत्याची चौकशी सुरू आहे. पण आम्ही पक्ष सोडला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेत राहू आणि लढू - संजय राऊत

Thu, 23 Jun 2022 11:09 AM

सुरतमधून परतलेले नितीन देशमुख व कैलास पाटील आज दुपारी पत्रकार परिषद घेणार

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख व कैलास पाटील सुरतमधून परतले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आमदारांवर किती दबाव आहे हे लवकरच कळेल - संजय राऊत

Thu, 23 Jun 2022 11:09 AM

Sanjay Raut: ईडीला घाबरून पळालेले आमदार हा शिवसेना पक्ष नाही - संजय राऊत

ईडीला घाबरून व आमिषाला बळी पडून कोणी आमदार पळाले असतील तर त्यानं काही फरक पडत नाही. आमदार हा काही पक्ष नाही. शिवसेना एकसंध आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाटचाल करत राहील - संजय राऊत

Thu, 23 Jun 2022 11:05 AM

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १२.३० वाजता अधिकारी व सचिवांना संबोधित करणार

राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर उद्धव ठाकरे आज राज्यातील अधिकारी व सचिवांना ऑनलाइन संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून समजतं.

Thu, 23 Jun 2022 10:53 AM

Maharashtra Political Crisis Live: एकनाथ शिंदे हे आज राज्यपालांकडं अधिकृत गटासाठी दावा करण्याची शक्यता 

शिवसेनेचे दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार सोबत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज राज्यपालांकडं 'अधिकृत शिवसेना' आमचीच असा दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळं आजच राज्य सरकारच्या भवितव्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. 

Thu, 23 Jun 2022 10:51 AM

Maharashtra Political Crisis Live: उद्धव ठाकरे यांच्या सोबत आता फक्त १४ आमदार

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हळूहळू शिवसेनेचे आमदार त्यांना पाठिंबा देत असून त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या ४१ झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आता फक्त १४ आमदार उरले आहेत.

Thu, 23 Jun 2022 9:35 AM

Maharashtra Political Crisis Live: महाराष्ट्रातील राजकीय पेच सुटेना, काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचानंतर काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजीनामा दिलेल्या किंवा विधानसभेतून अपात्र आमदारांना निवडणूक लढण्यास पाच वर्षांची बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.

Thu, 23 Jun 2022 9:35 AM

Maharashtra Political Crisis Live: आणखी तीन आमदार गुवाहाटीत पोहोचले

शिवसेनेचे आणखी तीन आमदार गुवाहाटीतील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या वाढली आहे.

Thu, 23 Jun 2022 10:00 AM

Maharashtra Political Crisis Live: शिवसेनेचे आणखी ६ आमदार नॉट रिचेबल

शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल फेसबुकवरून साधलेल्या संवादानंतरही शिवसेनेचे आमदार निघून जात आहेत. आज दोन आमदार सुरतला पोहचले असून ते गुवाहाटीला जाणार आहेत. तसंच नॉट रिचेबल असलेल्यांमध्ये मंत्री दादा भुसे यांच्यासह मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दिलीप लांडे, दीपक केसरकर आणि संजय राठोड यांचा समावेश आहे.