मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; १ ठार

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; १ ठार

Mar 15, 2023, 02:45 PM IST

    • Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच आहे. दोन मालवाहू ट्रक एकमेकांना धडकले असून यात एक जन ठार झाला आहे.
Samruddhi Mahamarg

Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच आहे. दोन मालवाहू ट्रक एकमेकांना धडकले असून यात एक जन ठार झाला आहे.

    • Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच आहे. दोन मालवाहू ट्रक एकमेकांना धडकले असून यात एक जन ठार झाला आहे.

छत्रपती संभाजी नगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. हर्सूल ते माळीवाडा दरम्यान समृद्धीमार्गावर एका भरधाव ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रकमधील एका जणाचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रक कांद्याची वाहतूक करत होता. अपघात एवढा भीषण होता की, दोन्हीही ट्रकला क्रेनच्या सहाय्याने एकमेकांपासून वेगळे करण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Lohagav News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

कांद्याची वाहतूक करणारा एक ट्रक भरधाव वेगाने समृद्धी महामार्गाने जात होता. यावेळी नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेला ट्रक पुढील ट्रकला जाऊन धडकला. या भीषण अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला तर ट्रक मधील एकाचा मृत्यू झाला. दोन्ही ट्रकला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले. अपघातानंतर महामार्गावर थोडा वेळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, या अपघातात ट्रकने मार्गावरील बॅरेकेड तोडून रस्त्याच्या खाली कोसळले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. अपघातील जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका कुटुंबाचे बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हे कुटुंब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याहून शेगावकडे निघाले होते. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉजवळील समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारचा अपघात झाला

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा