मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार रेलिंवर धडकल्यानं दोघांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार रेलिंवर धडकल्यानं दोघांचा मृत्यू

May 29, 2023, 09:04 AM IST

  • Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री कारला अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Samruddhi Mahamarg Car Accident (HT)

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री कारला अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री कारला अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Samruddhi Mahamarg Car Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर मागील काही महिन्यापासून अपघाताच्या बऱ्याच घटना घडल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच रविवारी मध्यरात्री कार रेलिंवर धडकल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण जखमी झाला आहे. बुलडाण्यातील देऊळगाव कोळ या गावाजवळ कारला अपघात झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

समृद्धी महामार्गावर कारला अपघात होऊन ती महामार्गाच्या रेलिंवर धडकली. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर कारला आग लागली. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि या आगीत कार जळून खाक झाली. यात कारमधील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, एकजण जखमी झाला आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त कार नागपूरहून शिर्डीच्या दिशेने जात होती. मात्र, बुलढाण्यातील देऊळगाव कोळ गावाजवळ कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हा अपघात इतका भीषण होता की, कार अक्षरशः जळून खाक झाली. यामुळे मृतांची ओळख पटलेली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा