मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या वाहनाला डंपरची धडक, पती चंद्रकांत सोनवणेही होते गाडीत

शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या वाहनाला डंपरची धडक, पती चंद्रकांत सोनवणेही होते गाडीत

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 27, 2023 11:19 PM IST

mla lata sonawane : जळगावच्या आमदार लता सोनवणे आणि त्यांचे पती तथा माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला जळगावच्या करंज गावाजवळ अपघात झाला.

Jalgaon accident
Jalgaon accident

एकनाथ शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे आणि त्यांचे पती तथा माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला जळगावच्या करंज गावाजवळ अपघात झाला. एका डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात ते किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्त्याचे भूमिपूजन करुन जळगावकडे येत असताना हा अपघात झाला. 

या अपघातात लता सोनवणे यांच्यासह त्यांचे पती  चंद्रकांत सोनवणे तसेच चालक व अंगरक्षकलाही किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर सोबत असलेल्या पोलीस स्कॉड वाहनातूनच जखमींना जळगावला हलविण्यात आले. हा अपघात करंज व धानोराच्या दरम्यान शनिवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. 

आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते कुरवेल ते तावसा या रस्त्याचे भूमिपूजन होते. तो कार्यक्रम आटोपून आमदार सोनवणे यांच्यासह त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे जळगावकडे येत होते. त्या वेळी चालकासह अंगरक्षकही वाहनात होते व मागे पोलिस स्कॉड होते. त्या वेळी डंपरने (एम.एच. १९, झेड - ६२४५) आमदार सोनवणे यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान होऊन वाहनातील चारही जणांना दुखापत झाली. अपघात होताच जखमींना जळगावला हलविले व प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.  अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून फरार झाला. 

WhatsApp channel