मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain: भाजपनं केलेला पुण्याचा विकास तिथल्या रस्त्यावरून वाहतोय; राष्ट्रवादीची बोचरी टीका

Pune Rain: भाजपनं केलेला पुण्याचा विकास तिथल्या रस्त्यावरून वाहतोय; राष्ट्रवादीची बोचरी टीका

Oct 18, 2022, 11:09 AM IST

  • Jayant Patil on Pune Rain: काही तासांच्या पावसामुळं पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

Pune Rain

Jayant Patil on Pune Rain: काही तासांच्या पावसामुळं पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

  • Jayant Patil on Pune Rain: काही तासांच्या पावसामुळं पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

Jayant Patil taunt BJP over Pune Flood Situation: पुणे व आसपासच्या परिसरात काल रात्री झालेल्या पावसामुळं काही तासांतच पुण्याचे जनजीवन विस्कळीत करून टाकले. अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या तर, आर्थिक नुकसानही झालं. रस्त्यावर ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळं पुणेकरांचे अक्षरश: हाल-हाल झाले. त्यावरून पुणेकर संताप व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं हीच संधी साधून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Metro : लोकसभा निवडणुकीत मतदान करा अन् मिळवा...; मुंबई मेट्रोची खास ऑफर!

Parbhani Murder: हॉटेलमध्ये नाश्ता देण्यावरून वाद, ग्राहक तरुणाची हत्या, तिघांविरोधात गुन्हा दाखल!

Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्याच्या वेगवेगळ्या भागांतील फोटो ट्वीट करत भारतीय जनता पक्षावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. ‘पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेल्या २४ तासांत नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. मागची पाच वर्षे पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे. 'पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या शहरात असं चित्र निर्माण होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांचं पुणेकरांना आवाहन

पुण्यातील पावसामुळं झालेल्या पूरस्थितीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी पुण्याचे जिल्हाधिकारी व पुणे महापालिका आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली. परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. अत्यंत महत्वाचे व गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावं, काळजी घ्यावी. गरज भासल्यास प्रशासनाची मदत घ्यावी. प्रशासनानंही नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कृपया आपत्ती व्यवस्थापन व तत्सम यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्या, तसंच सर्वतोपरी सहाय्य करावं, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा