मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain : पुण्यात पावसाचा हाहाकार; अग्निशमन दलाने वाचवले तब्बल १२ जणांचे प्राण

Pune Rain : पुण्यात पावसाचा हाहाकार; अग्निशमन दलाने वाचवले तब्बल १२ जणांचे प्राण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 18, 2022 07:36 AM IST

Pune Rain update, fire bridge save life of 12 people : पुण्यात सोमवारी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. काही तास झालेल्या पावसाने रस्त्यांवर पुरस्थिती निर्माण झाली होती. पावसाचे पाणी आंनेक घरात शिरले होते. मंगळवार पेठेत एका घरात पाणी शिरल्याने या घरातील तब्बल १२ नागरिकांची अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची सुखरूप सुटका केली.

पाण्यात अडकलेल्या कुटुंबियांची सुखरूप सुटका करण्यात आली
पाण्यात अडकलेल्या कुटुंबियांची सुखरूप सुटका करण्यात आली

पुणे : पुण्याला काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने पुन्हा झोपडपले. या पवासमुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पाण्याचा जोर एवढा होता की रस्त्यावर लावलेल्या काही दुचाक्या या पाण्यात वाहून गेल्या. या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले होते. रेल्वे स्थानक आणि जवळील भुयारी मार्गात तब्बल ४ फुट पाणी साचले होते. मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. या कुटुंबाची सुटका अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

सोमवारी झालेल्या पावसाने पुन्हा एकदा पुण्याची वाताहत केली. पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर पुर आला. मोठ्या प्रमाणात पाणी सचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक भागात घरांमध्ये तसेच काही हॉटेलमध्ये पाणी शिरले होते. तर सखल भागातील घरात देखील पाणी शिरले होते. शहरात अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट आणि झाडपडीच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे काही नागरिकांचे प्राण वाचवण्यात आले.

शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला असता विविध ठिकाणी पाणी शिरल्याच्या व इतर घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात नोंद झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकुण १२ जणांची सुखरुप सुटका करुन आपले कर्तव्य चोख बजावले आहे.

मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळविताच तिथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील ०३ लहान मुली ०१ महिला व ०१ पुरूष (एकुण ०५) यांना सुखरुप बाहेर आणले. यामधे तांडेल राजाराम केदारी यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले व याचा विडीओ सोशल मिडियावर बराच प्रसिद्ध झाला.

कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्व ०७ सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामधे जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली.

अग्निशमन दलाकडे सोमवारी राञी ०९•५७ वाजेपासून विविध प्रकारच्या वर्द्या प्राप्त झाल्या होत्या. यामधे मंगळवारी पहाटे ०४•०० वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकुण २० तक्रारी प्राप्त झाल्या. यात येवलेवाडी स्मशानभूमीजवळ - सुखसागर नगर, अंबामाता मंदिर - कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड - रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ - सुखसागर नगर, डॉल्फिन चौक - बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर - हडपसर, गाडीतळ - शिवाजीनगर पोलिस मुख्यालय - मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम - कसबा पेठ, फिश मार्केट जवळ - कुंभार वाडा समोर - नारायण पेठ, मोदी गणपती - औंध, डिएव्ही स्कुल गल्ली - कसबा पेठ, पवळे चौक - कसबा पेठ, भुतडा निवास - पर्वती, मिञमंडळ चौक - गंज पेठ - भवानी पेठ तसेच ०१ ठिकाणी पाणी अनेक घरात पाणी शिरले होते.

तर सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना पर्वती, रमणा गणपतीजवळ घडली. तसेच झाडपडी ०३ ठिकाणी ज्यामधे हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामधे दलाची मदत पोहोचण्यापुर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते.

 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग