मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  pune accident : पुण्यात झाड पडून एकाचा मृत्यू; स. प. महाविद्यालयाच्या आवारातील घटना

pune accident : पुण्यात झाड पडून एकाचा मृत्यू; स. प. महाविद्यालयाच्या आवारातील घटना

Aug 22, 2022, 09:41 PM IST

    • पुण्यात पावसामुळे झाडपडीच्या घटना वाढल्या आहेत. अशाच एका घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.
पुणे अॅक्सिडेंट न्यूज

पुण्यात पावसामुळे झाडपडीच्या घटना वाढल्या आहेत. अशाच एका घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.

    • पुण्यात पावसामुळे झाडपडीच्या घटना वाढल्या आहेत. अशाच एका घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.

पुणे : पुण्यात स. प. महाविद्यालयाच्या आवारात एक झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात अलायी आहे. पुण्यात या वर्षी झाडपडीच्या सर्वात जास्त घटना घडल्या. २०० हून अधिक झाडे आतापर्यन्त कोसळली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मालसिंग पवार (वय ५०, रा. जनता वसाहत, पर्वती) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवार हे स. प. महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या वसतीगृहाच्या परिसरात वाढलेले गवत कापण्यासाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास गेले होते. त्या वेळी अचानक झाड कोसळले. झाडाच्या फांद्या पवार यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पवार मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांना महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या वसतीगृहातील गवत कापण्याचे काम देण्यात आले होते.

अग्निशामक विभागातर्फे पुण्यातील धोकादायक झाडांची तोड करण्यात आली आहे. पुण्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अनेक झाडे ही कमकुवत झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा झाडांचा आधार घेतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा