मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: मरावे परी अवयवरूपे उरावे… ब्रेनडेड महिलेनं दिलं दोन जवानांना जीवदान

Pune: मरावे परी अवयवरूपे उरावे… ब्रेनडेड महिलेनं दिलं दोन जवानांना जीवदान

Jul 15, 2022, 07:17 PM IST

    • Pune Organ Donation News: पुण्यात लष्कराच्या कमांड रुग्णालयात एका ब्रेनडेड महिलेले लष्कराच्या दोन जवानांना अवयव दान करुन त्यांना जिवदान दिले आहे.
उपचार करण्यात आलेले जवान

Pune Organ Donation News: पुण्यात लष्कराच्या कमांड रुग्णालयात एका ब्रेनडेड महिलेले लष्कराच्या दोन जवानांना अवयव दान करुन त्यांना जिवदान दिले आहे.

    • Pune Organ Donation News: पुण्यात लष्कराच्या कमांड रुग्णालयात एका ब्रेनडेड महिलेले लष्कराच्या दोन जवानांना अवयव दान करुन त्यांना जिवदान दिले आहे.

Braindead Woman gives Life to two Armymen:  ‘मरावे परी किर्ती रुपी उरावे’ असे म्हटले जाते. आयुष्य जगतांना कुणी चांगले काम केल्याने आयुष्यभर स्मरणात राहतात. तर काही व्यक्ती अवयव दान करून अजरामर होतात. पुण्यात अशाच एका ब्रेनडेड महिलेले आपले अवयव दान करुन देशासाठी सीमेवर लढणा-या दोन गरजू जवानांना अवयव दान करत त्यांना जीवदान दिले आहे. या सोबतच अवयवदानाचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुण्यात एका दुर्दैवी घटनेमुळे एक महिला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या कमांड रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. येथील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मात्र, त्या ब्रेनडेड झाल्या. जीवंत असूनही त्या मृत्यूच्या दारात होत्या. यावेळी या महिलेच्या कुटुंबीयांनीच त्यांच्या अवयव दानाचा महत्वाचा निर्णय घेतला. त्यांनी अशा अवस्थेत अवयव दान करता येते असे माहिती होते. त्यांनी लष्करी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. या सोबतच रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयकांशीही चर्चा केली. यानंतर त्या कुटुंबाने अवयवांची अत्यंत गरज असलेल्या रुग्णांना तरुण महिलेचे अवयव दान केले जावेत अशी इच्छा व्यक्त केली.

अवयवदान प्रक्रियेसाठी आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर कमांड रुग्णालयातील प्रत्यारोपण पथक तातडीने कार्यरत झाले आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (झेडटीसीसी) आणि लष्कराच्या अवयव पुनर्प्राप्ती आणि प्रत्यारोपण प्राधिकरण यांना याबद्दल सूचित करण्यात आले. गुरुवारी (दि १४) आणि शुक्रवारी (दि १५) पहाटे या काळात त्या महिलेच्या शरीरातील मूत्रपिंडासारखे महत्त्वाचे अवयव भारतीय लष्करात सेवा बजावणाऱ्या दोन जवानांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. तर डोळे, कमांड रुग्णालयातील सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालय संकुलातील नेत्रपेढीत सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात आले. त्या महिलेचे यकृत, पुण्याच्या रुबी हॉल दवाखान्यातील गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा