मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : मंत्रीपद न मिळण्यावर पंकजा मुंडेंनी सोडले मौन, म्हणाल्या “मी स्वाभिमानाने..”

Pankaja Munde : मंत्रीपद न मिळण्यावर पंकजा मुंडेंनी सोडले मौन, म्हणाल्या “मी स्वाभिमानाने..”

Aug 11, 2022, 06:41 PM IST

    • पंकजा मुंडे (Pankaja munde ) यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यासंदर्भात आता पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे.
पंकजा मुंडे (

पंकजा मुंडे (Pankajamunde ) यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यासंदर्भात आता पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे.

    • पंकजा मुंडे (Pankaja munde ) यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यासंदर्भात आता पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे.

बीड – शिंदे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी पार पडला. एक महिन्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही अनपेक्षित चेहऱ्यांना संधी दिल्याने टीका व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर पंकजा मुंडे (Pankaja munde ) यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यासंदर्भात आता पंकजा मुंडे (Pankaja munde ) यांनी आपले मौन सोडले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Nashik Accident: नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल विचारणा करण्यात आल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल कदाचित. अजून पात्रतेचे लोक असतील त्यांच्याकडे. त्यांना जेव्हा माझी मंत्रिमद देण्याइतपत पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याबद्दल केवळ चर्चा माध्यमात चर्चा होतात. मी व माझे कार्यकर्ते शांत आहोत. मंत्रीपदाबाबत माझी काही भूमिका असण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रीमंडळ बनवायचं असतं, त्यात सगळ्यांना समाधानी करता येत नसतं. पण जे मंत्री झाले आहेत, त्यांनी तरी लोकांना समाधानी करावं. 

आज महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतली. त्यानंतर दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जानकर म्हणाले की, जेव्हा आम्ही २५-३० आमदार निवडून आणू त्यावेळी मंत्रिपदासाठी बोलू.