मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Drown: पालघरच्या डहाणू येथील साखरा डॅमला पोहण्यासाठी गेलेले ३ जण बुडाले

Palghar Drown: पालघरच्या डहाणू येथील साखरा डॅमला पोहण्यासाठी गेलेले ३ जण बुडाले

May 31, 2023, 08:10 AM IST

  • Dahanu: पालघरच्या डहाणू येथील सारखा डॅमला पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण पाण्यात बुडाले.

youth drown (HT)

Dahanu: पालघरच्या डहाणू येथील सारखा डॅमला पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण पाण्यात बुडाले.

  • Dahanu: पालघरच्या डहाणू येथील सारखा डॅमला पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण पाण्यात बुडाले.

Sakhra Dam: पालघरच्या डहाणू येथील साखरा डॅमला पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुण पाण्यात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एकाच तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Pune Lohegaon News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत पडवले, देवजी पडवले आणि दीपक पडवले हे तिघेजण साखरा डॅमला पोहण्यासाठी गेले होते. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. या घटनेत अनिकेत पडवले याचा मृत्यू झाला आहे. तर, देवजी पडवले आणि दीपक पडवले यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. त्यानंतर स्थानिकांनी त्वरीत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

अनिकेत पडवले, देवजी पडवले आणि दीपक पडवले हे डहाणूच्या सरावली येतील रहिवाशी आहेत. तिघांनीही वाणगाव येथून आपले आयटीआयच शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, अवघ्या तरुण वयात अनिकेतचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आस्कमित मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा