मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात पाकिस्तानी नागरिकाचा बेकायदा रहिवास; बनावट पारपत्र जप्त, चौकशी सुरू

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात पाकिस्तानी नागरिकाचा बेकायदा रहिवास; बनावट पारपत्र जप्त, चौकशी सुरू

Mar 15, 2023, 12:30 PM IST

    • Pune crime : बनावट पासपोर्ट काढून पुण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका पाकिस्तानी युवकला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
Gondia crime news

Pune crime : बनावट पासपोर्ट काढून पुण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका पाकिस्तानी युवकला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

    • Pune crime : बनावट पासपोर्ट काढून पुण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका पाकिस्तानी युवकला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : बेकायदेशीर पारपत्र घेऊन पुण्यात राहणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने बनावट पारपत्राद्वारे पुणे ते दुबई प्रवास देखील केला आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

महम्मद अमान अन्सारी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट भारतीय पारपत्र जप्त केले आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे, तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

अन्सारी पाकिस्तानी नागरिक आहे. तो शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. तो भवानी पेठेत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकत चुडामण तालीम चौक परिसरातून अन्सारीला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट भारतीय पारपत्र सापडले. त्याला अटक करून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पुण्यात राहण्याचा त्याचा हेतू काय होता. तो दहशतवादी कारवाईमध्ये सामील आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा