मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Mumbai Lalbaug Crime News: Woman's Decomposed Dead Body Found In Plastic Bag, Daughter Arrested

Lalbaug Crime : लालबाग हादरले! घरातील कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत आढळला महिलेचा मृतदेह

Lalbhaug murde
Lalbhaug murde
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
Mar 15, 2023 11:17 AM IST

Lalbaug dead body News : लालबाग येथील पेरू कंपाऊंड परिसरात एका घरात महिलेच्या मृतदेह आढळला. भयंकर बाब म्हणजे या महिलेचा मृतदेह हा एका प्लॅस्टिकच्या पिशवीत आढळला आहे.

Lalbaug Dead body Case : मुंबईच्या लालबाग परिसरातील पेरू कंपाऊंड परिसरात एका घरात महिलेचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचा  मृतदेह हा एका प्लॅस्टिक बॅगेत बांधून कपाटात बंद करून ठेवण्यात आला होता. मृत महिलेचे वय साधारणत: ५० ते ५५ असून ती तिच्या मुलीकडे राहत असल्याची माहिती प्राथमिक तपासात आढळली आहे. मुलीनेच आपल्या आईचा खून केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईच्या लालबाग परिसरातील पेरू कंपाऊंड परिसरात एका घरात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी घराची झडती घेतली असता त्यांना घरातील कपाटात माहीलेचे शव आढळले. या महिलेचे शव एका प्लॅस्टिक बॅगेत बांधण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. उत्तरीय तपासणीसाठी तो पाठवण्यात आला आहे.

या बाबत परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला लालबागच्या इब्राहिम कासिम इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत असून ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने आणि भाच्याने मंगळवारी रात्री काळाचौकी पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी इमारतीत आले.

त्यावेळी घरात शोध घेतला असता एका कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलीला ताब्यात घेतण्यात आले आहे. पोलिस तिची चौकशी केली जात आहे. महिलेची हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर कळणार आहे.

विभाग