मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Death Threat : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; सिल्व्हर ओकवर धमकीचा फोन आल्यानं खळबळ

Death Threat : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; सिल्व्हर ओकवर धमकीचा फोन आल्यानं खळबळ

Dec 13, 2022, 11:48 AM IST

    • Sharad Pawar Death Threat : शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर धमकीचा फोन आल्यानं मुंबईत खळबळ उडाली आहे.
Sharad Pawar Death Threat In Mumbai (PTI)

Sharad Pawar Death Threat : शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर धमकीचा फोन आल्यानं मुंबईत खळबळ उडाली आहे.

    • Sharad Pawar Death Threat : शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर धमकीचा फोन आल्यानं मुंबईत खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar Death Threat In Mumbai : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीनं फोन करून शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली असून त्यानंतर आता पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता थेट शरद पवारांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यानं मुंबईत खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची परेड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीनं शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी फोन करून पवारांना देशी कट्ट्यानं ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर या प्रकरणात पवारांच्या निकटवर्तीयांनी मुंबईतील गावदेवी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. फोनवरून धमकी देणारा व्यक्ती हिंदीतून बोलत होता. शरद पवारांचा कालच वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर त्यांची हत्या करण्याबाबत धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांना धमकीचा फोन बिहारमधून आला होता. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात पेटलेल्या सीमावादाच्या प्रकरणात शरद पवारांनी थेट आणि रोखठोक भूमिका घेतल्यानंच त्यांना धमकीचा फोन आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही शरद पवारांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिासांनी बिहारमधून अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा बिहारमधून धमकीचा फोन आल्यानं पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.