मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shirdi Accident : साईभक्तांना घेऊन जाणाऱ्या बसला नाशिक-शिर्डी हायवेवर भीषण अपघात, १० ठार

Shirdi Accident : साईभक्तांना घेऊन जाणाऱ्या बसला नाशिक-शिर्डी हायवेवर भीषण अपघात, १० ठार

Jan 13, 2023, 11:37 AM IST

  • Nashik Accident News : साईभक्तांना शिर्डीला घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला झालेल्या अपघातात १० जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Bus Accident

Nashik Accident News : साईभक्तांना शिर्डीला घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला झालेल्या अपघातात १० जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

  • Nashik Accident News : साईभक्तांना शिर्डीला घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला झालेल्या अपघातात १० जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Nashik Shirdi Highway Accident News : नाशिक शिर्डी महामार्गावर साईभक्तांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला झालेल्या अपघातात १० भाविक ठार झाले आहेत, तर १२ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांमध्ये ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर व बदलापूर येथील नागरिकांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

वावी पाथरे गावाजवळ आज पहाटे हा अपघात झाला. साई दर्शनासाठी भाविकांना घेऊन ही बस (क्र MH 04 SK 2751) शिर्डीच्या दिशेनं निघाली होती. या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी होते. शिर्डीहून सिन्नरच्या दिशेनं येणाऱ्या मालवाहू ट्रकशी (MH 48 T 1295) या बसची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात दहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिला, दोन पुरुष व दोन लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी दिली. जमखी झालेल्या प्रवाशांपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. जखमींना नाशिक व सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा