मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samrudhhi Mahamarg Accident : शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघे ठार

Samrudhhi Mahamarg Accident : शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघे ठार

Jun 03, 2023, 12:32 PM IST

    • Samriddhi Highway Accident : केवळ आठ दिवसांपूर्वी उद्घाटंन झालेल्या शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गावर चालकाचं कार वरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघे घर झाले आहे.
Road Accident

Samriddhi Highway Accident : केवळ आठ दिवसांपूर्वी उद्घाटंन झालेल्या शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गावर चालकाचं कार वरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघे घर झाले आहे.

    • Samriddhi Highway Accident : केवळ आठ दिवसांपूर्वी उद्घाटंन झालेल्या शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गावर चालकाचं कार वरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघे घर झाले आहे.

शिर्डी : आठ दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री एका कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोघे ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सिन्नरच्या पूर्व भागात मध्यरात्री घडला.

ट्रेंडिंग न्यूज

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Mumbai Accident : रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ट्रकनं चिरडलं; मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील घटना

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Mumbai News : धक्कादायक ! वाकोल्यात उघड्या वीजवाहक तारेचा शॉक लागून चिमुकली ठार; चिमुकला जखमी

धरमसिंग गुसींगे, राजेंद्र राजपूत या दोघांचा मृत्यू झाला असून भरतसिंग परदेशी, नंदिणी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विकासाचा महामार्ग असणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आठ दिवसांपूर्वी शिर्डी ते भरवीर या दरम्यान असलेल्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. या महामार्गावर मुंबईकडून शिर्डीकडे कार मधून एक परिवार जात होते. दरम्यान, कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडरवर आदळली. यामुळे कार दोन ते तीन वेळा पलटी झाली. या अपघातात कार मधील दोघे ठार झाले आहेट. तर दोघे जण जखमी झाले आहेत.

 

अपघाताची महिती कळताच महामार्गावरील रेस्क्यू पथक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना कोपरगाव येथील रुग्णालयात प्राथमिक औषधोपचारासाठी पाठवले. अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करून मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. हा रस्ता सुरू झाल्यावर हा पहिलाच अपघात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा