मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitin Gadkari: नितीन गडकरींच्या नावाने बनावट पोस्ट व्हायरल; नागपूर पोलिसांत तक्रार दाखल

Nitin Gadkari: नितीन गडकरींच्या नावाने बनावट पोस्ट व्हायरल; नागपूर पोलिसांत तक्रार दाखल

Mar 04, 2023, 07:38 AM IST

  • Nitin Gadkari Fake News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावाने सोशल मीडियावर बनावट पोस्ट व्हायरल होत असून याप्रकरणी नागपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nitin Gadkari (HT_PRINT)

Nitin Gadkari Fake News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावाने सोशल मीडियावर बनावट पोस्ट व्हायरल होत असून याप्रकरणी नागपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • Nitin Gadkari Fake News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावाने सोशल मीडियावर बनावट पोस्ट व्हायरल होत असून याप्रकरणी नागपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nitin Gadkari Viral Video: पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने बनावट पोस्ट व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या पोस्टमध्ये नितीन गडकरी राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या देत आहेत. मात्र, ही पोस्ट बनावट असल्याचे गडकरी यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले असून याप्रकरणी नागपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Mumbai Accident : रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ट्रकनं चिरडलं; मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील घटना

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

पुण्यातील कसबा निवडणूक निकालाबाबात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटे आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत. नागपूर पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली असून मा. गडकरीजी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे, अशा आशयाचे ट्वीट नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

कसबा पोटनिवडणुकीत मविआचे उमेदवार रंवीद्र धंगेकरांचा दणदणीत विजय झाला आहे. विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली. मविआच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा