मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Crime : नागपूर हादरले ! बायकोला धडा शिकवण्यासाठी बापानेच पोटच्या मुलीचा केला खून

Nagpur Crime : नागपूर हादरले ! बायकोला धडा शिकवण्यासाठी बापानेच पोटच्या मुलीचा केला खून

Nov 13, 2022, 05:00 PM IST

    • Nagpur Crime News : एका हत्याकांडामुळे नागपूर हादरले आहे. एका बापाने आपल्या बायकोला धडा शिकवण्यासाठी आपल्या पोटच्या मुलीचा खून करत तिच्या आत्महत्येचा बनाव केल्याने खळबळ उडाली आहे.
nagpur crime (HT_PRINT)

Nagpur Crime News : एका हत्याकांडामुळे नागपूर हादरले आहे. एका बापाने आपल्या बायकोला धडा शिकवण्यासाठी आपल्या पोटच्या मुलीचा खून करत तिच्या आत्महत्येचा बनाव केल्याने खळबळ उडाली आहे.

    • Nagpur Crime News : एका हत्याकांडामुळे नागपूर हादरले आहे. एका बापाने आपल्या बायकोला धडा शिकवण्यासाठी आपल्या पोटच्या मुलीचा खून करत तिच्या आत्महत्येचा बनाव केल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर : पत्नीला आणि तिच्या घरण्याना धडा शिकवण्यासाठी आपल्या १६ वर्षांच्या पोटच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नराधम बापाने आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. पोलिसांनी या हत्याकांडाचा पर्दाफाश केला असून नराधम बापाला अटक केली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत देवीनगर भागात ही घटना घडली.

ट्रेंडिंग न्यूज

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरुद्ध निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

ICSE Result 2024 : ठाण्यातील रेहान सिंह बारावी ICSE बोर्डात भारतात पहिला, केवळ एका गुणाने हुकले १०० टक्के

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

गुड्डू रजक असे अटक करण्यात आलेल्या नराधम बापाचे नाव आहे. गुड्डू रजक याचे त्यांचा दुसऱ्या बायकोशी पटत नव्हते. त्यामुळे ती माहेरी निघून गेली होती. ती नांदायला येत नसल्याने तिला आणि पत्नीला फसवण्याच्या हेतूने गुड्डू रजकने आपल्या १६ मुलीची हत्या केली आणि तिच्या आत्महत्येचा बनाव रचला. यानंतर त्याने स्वत: नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत देवीनगर आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार दिली. दरम्यान शेजाऱ्यांना देखील मुलीने आत्महत्या केल्याचे सजमत होते. या प्रकरणी सहा नोव्हेंबर रोजी गुड्डू रजकने पोलिसांकडे तक्रार दिली होती. सावत्र आईच्या काही नातेवाईकांकडून लग्नासाठी दबाव आणला जात असल्यामुळे नैराश्यात आपण आत्महत्या करत आहोत, अशा आशयाची सुसाईड नोटही मुलीच्या गळफास लावलेल्या मृतदेहाशेजारी सापडले होते. दरम्यान, पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी घटणस्थळांचा पंचनामा केला. यात त्यांना घरातील छताची उंची बारा फुटापेक्षाही कमी असल्याने आणि मृतदेह हा संशयास्पद आढळल्याने पोलिसांना हा आत्महतेचा बनाव असल्याचा संशय बळावला. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला.

रजकचा मोबाईल तपासला, तेव्हा काही गोष्टी संशयास्पद आढळल्या. या बाबत चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मात्र, तो येत नव्हता. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची सखोल चौकशी केल्यास त्याने खून केल्याची कबुली दिली. त्याने हे का केले हे विचारल्यावर पोलिसांना धक्का बसला. पहिली पत्नी मरण पावल्यानंतर लग्न केलेली दुसरी पत्नी कौशल्या वारंवार बोलावल्यानंतरही सोबत नांदायला येत नाही. यामुळे गुड्डू रजक याने काही दिवसांपूर्वी मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असा बनाव करत पत्नीवर घरी येण्याचा दबाव टाकला होता. मात्र पत्नी त्या दबावाला बळी पडून सोबत नांदायला न आल्यामुळे गुड्डू रजक ने एक पाऊल पुढे जाऊन ६ नोव्हेंबर रोजी मुलीने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला अशा आशयाचे व्हिडिओ बनवण्यासाठी मुलीला गळ्यात गळफास लावून छोट्या स्टूलवर उभे राहण्यास सांगितले आणि अचानकच स्कूलला लाथ मारून मुलीला गळफास लावलेल्या अवस्थेत लटकवून देत तिचा खून केला. यानंतर स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन त्याने तक्रार दिली.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा