मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; ब्रेक फेल कंटेनरनं ७ वाहनांना उडवलं, एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; ब्रेक फेल कंटेनरनं ७ वाहनांना उडवलं, एकाचा मृत्यू

May 23, 2023, 05:41 PM IST

  • मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटनेरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत.

Accident (HT)

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटनेरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत.

  • मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटनेरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत.

Mumbai Pune Expressway Road Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात घडला आहे. ब्रेक झालेल्या कंटेनरने एकापाठोपाठ ७ वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात सोमवारी (२२ मे २०२३) रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच कंटनेर चालकालाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Mumbai Accident : रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ट्रकनं चिरडलं; मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील घटना

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महामार्गावर सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास एक कंटेनर वेगाने जात होता. परंतु, अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनरने समोर आलेल्या ७ वाहंनाना जोरदार धडक दिली. या धडकेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कंटेनर चालक घनास्थळवरून पळून गेला. मात्र, बोर घाटात पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पण पोलीस प्रशासनाने इतर वाहनांना वाट करून दिली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा