मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर हे वाचा मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

Mumbai Local : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर हे वाचा मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

Apr 30, 2023, 06:57 AM IST

    • Mumbai Local Mega Block : मध्यरेल्वेनं आज देखभालदुरुस्ती आणि काही तांत्रिक कामे हाती घेतली असल्याने मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणे टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Local Megablock (HT)

Mumbai Local Mega Block : मध्यरेल्वेनं आज देखभालदुरुस्ती आणि काही तांत्रिक कामे हाती घेतली असल्याने मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणे टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.

    • Mumbai Local Mega Block : मध्यरेल्वेनं आज देखभालदुरुस्ती आणि काही तांत्रिक कामे हाती घेतली असल्याने मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणे टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई: रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीची कामे तसेच काही तांत्रिक बाबी दुरुस्त करण्यासाठी मध्य रेल्वेने आज मेगाब्लॉग जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर असणार आहे. त्यामुळे आज सुट्टीनिमित्त जर घराबाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur Accident: भरधाव कार झाडावर आदळून नदीत बुडाली, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूर येथील घटना

Navi Mumbai: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून मुलीचे अश्लील फोटो केले व्हायरल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या कांदिवली येथील खासगी रुग्णालयाला आग, ४ जण होरपळले

Sambhaji nagar : पत्नी सोडून गेल्याने दारूच्या नशेत पतीने पोटच्या मुलांना फेकले विहिरीत; एकाचा मृत्यू

रेल्वेने जारी केलेल्या मेगाब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल या मार्गावरची वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत सीएसएमटीहून पनवेलसाठी एकही लोकल जाणार नाही. असे असले तरी पनवेल ते वाशी, आणि सीएसएमटी ते कुर्ला अशा विशेष लोकल या मार्गावर धावणार आहेत. ब्लॉक कालावधीत प्रवाशांना ठाणे-वाशी मार्गावरून प्रवास करता येणार आहे.

Samruddhi Mahamarg : समृद्धी मार्गावर हरियाणा पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात; महिला पोलीस उपनिरिक्षकाचा मृत्यू

मेगाब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याहून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत तसेच वाशी, बेलापूर, पनवेल करीता सुटणारी सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे, गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहे. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. पनवेल ते कुर्ल्या दरम्यान विशेष सेवा सुमारे २० मिनिटांच्या अंतराने चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६ पर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करता येणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा