मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg : समृद्धी मार्गावर हरियाणा पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात; महिला पोलीस उपनिरिक्षकाचा मृत्यू

Samruddhi Mahamarg : समृद्धी मार्गावर हरियाणा पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात; महिला पोलीस उपनिरिक्षकाचा मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 29, 2023 02:05 PM IST

Samruddhi Mahamarg accident news : समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला असून पोलिसांचे वाहन ट्रकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला तर ३ कर्मचार्‍यांसह आरोपी गंभीर जखमी झाला आहे.

Samruddhi Mahamarg accident news
Samruddhi Mahamarg accident news (HT)

वर्धा : समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. काही केल्या या मार्गावरील अपघात थांबण्याचे नाव घेत नाही. उद्घाटन झाल्यापासून अनेक भीषण अपघात या मार्गावर झाले आहेत. असाच एक अपघात आज झाला आहे. या अपघातत हरियाणा पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला तर ३ कर्मचार्‍यांसह आरोपी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना (दि २९) आज सकाळी ७ वाजता पांढरकवढा गावाजवळ घडली.

Indian Army: भारतीय लष्कराच्या तोफखाण्याची महिला अधिकारी सांभाळणार धुरा; शत्रूच्या चौक्या करणार उद्ध्वस्त

अपघातात महिला पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह, मिठ्ठू जगडा आणि चालक शम्मी कुमार यांच्यासह आरोपी वैद्यनाथ शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा पोलिसांचे वाहन हे भरधाव वेगात असलेल्या ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला. हरियाणा पोलिसांचे एक पथक परभणी येथून आरोपीला घेऊन नागपूरकडे जात होते. ही गाडी भरधाव वेगात होते.

APMC Election 2023 : वैजापूर बाजार समितीवर भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; आमदार बोरनारेंनी बाजी मारली

दरम्यान, ही गाडी एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकला मागून धडकली. जखमी झालेल्यांना सावंगी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याबाबत सावंगी पोलिसांनी माहिती दिली आहे. हरियाणा येथील पंचकुला पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण आणि त्यांचे सहकारी एका फसवणुकीच्या गुन्हयातील आरोपी वैद्यनाथ शिंदे याला घेवून बोलेरो पोलिस वाहनाने नागपूरच्या दिशेने जात होत्या. समध्दी महामार्गावरील पांढरकडा गावाच्या परिसरात असता त्याच्या वाहनाचा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक, पोलिस अधिकारी संदीप खरात आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग