मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train Maga block : मुंबईत मेगाब्लॉक; सीएसएमटी ते पनवेल मार्गावर दोन्ही बाजूंची लोकल ५ तास राहणार बंद

Mumbai Local Train Maga block : मुंबईत मेगाब्लॉक; सीएसएमटी ते पनवेल मार्गावर दोन्ही बाजूंची लोकल ५ तास राहणार बंद

Mar 26, 2023, 07:53 AM IST

  •  Mumbai Railway Mega block on Sunday, 26 March 2023 : मुंबईकरांनो सुट्टीनिमित्त फिरण्याचा किंवा कामानिमित्त आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल. तर मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडाल. रेल्वे रुळांच्या देखभालीच्या कामासाठी मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात सीएसएमटी ते पनवेल दरम्यानची वाहतूक पाच तास बंद राहणार आहे.

Mumbai Local Megablock (HT)

Mumbai Railway Mega block on Sunday, 26 March 2023 : मुंबईकरांनो सुट्टीनिमित्त फिरण्याचा किंवा कामानिमित्त आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल. तर मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडाल. रेल्वे रुळांच्या देखभालीच्या कामासाठी मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात सीएसएमटी ते पनवेल दरम्यानची वाहतूक पाच तास बंद राहणार आहे.

  •  Mumbai Railway Mega block on Sunday, 26 March 2023 : मुंबईकरांनो सुट्टीनिमित्त फिरण्याचा किंवा कामानिमित्त आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल. तर मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडाल. रेल्वे रुळांच्या देखभालीच्या कामासाठी मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात सीएसएमटी ते पनवेल दरम्यानची वाहतूक पाच तास बंद राहणार आहे.

Mumbai Railway Mega block on 26 March 2023 : नियमित देखभाल दुरुस्ती व अभियांत्रिकी कामासाठी रविवार, २६ मार्च २०२३ रोजी मध्य रेल्वेनं उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तिन्ही महत्वाचे रेल्वे मार्ग आज या कामामुळे तब्बल ५ तास बंद राहणार आहेत. सकाळी साडे दहा ते दुपारी साडे तीनपर्यंत सीएसएमटीहून पनवेलसाठी एकही लोकल सुटणार नाही. मात्र पनवेल ते वाशी, आणि सीएसएमटी ते कुर्ला अशा विशेष लोकल धावणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

मध्य रेल्वे : ठाणे-कल्याण सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ या वेळेत सुटणाऱ्या जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान स्लो ट्रॅकवर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या पूर्वनियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरानं निश्चित स्थानकावर पोहोचतील.

कल्याणहून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान स्लो ट्रॅकवर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या पूर्वनियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० मिनिटं उशिरानं निश्चित स्थानकावर पोहोचतील.

हार्बर रेल्वे : कुर्ला- वाशी मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी साठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील.

वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी - पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा