मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Electricity : मुंबईकरांना बसणार वीज दरवाढीचा झटका.. BEST कडून १८ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव

Mumbai Electricity : मुंबईकरांना बसणार वीज दरवाढीचा झटका.. BEST कडून १८ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव

Jan 24, 2023, 06:28 PM IST

  • Mumbai electricity tariff hike : मुंबईकरांना लवकरच वीजदरवाढीचा झटका बसणार आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी व टाटा पॉवरनंतर आता बेस्टनेही वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक मंडळाकडे पाठवला आहे.

मुंबईकरांना बसणार वीज दरवाढीचा झटका..

Mumbaielectricity tariff hike : मुंबईकरांना लवकरच वीजदरवाढीचा झटका बसणार आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी व टाटा पॉवरनंतर आता बेस्टनेही वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक मंडळाकडे पाठवला आहे.

  • Mumbai electricity tariff hike : मुंबईकरांना लवकरच वीजदरवाढीचा झटका बसणार आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी व टाटा पॉवरनंतर आता बेस्टनेही वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक मंडळाकडे पाठवला आहे.

Mumbai Electricity Bill Hike : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने कंबरडे मोडणाऱ्या मुंबईकरांना लवकरच वीजदरवाढीचा झटका बसणार आहे. मुंबईसाठी वीज पुरवठा करणाऱ्या  अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरने वीजदरवाढीचा प्रस्ताव दिल्यानंतर आता बेस्टनेही वाढत्या उत्पादन खर्चावर उपाय म्हणून वीजदरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. बेस्टने १८ टक्के वीजदरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव तयार केला आहे. बेस्टकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (MERC) वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे एप्रिलपासून मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसू शकतो. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी

Mumbai Water Cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट? ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा!

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

बेस्टने १८ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याने मुंबईकरांच्या वीज बिलामध्ये १८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० युनिट पर्यंत १८ टक्के दरवाढीचा प्रस्ताव असून १०१ ते ३०० युनिट पर्यंत ६ टक्केपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर ३०१ ते ५०० व त्याच्या पुढे दोन टक्के वीज दरवाढीची  शक्यता आहे. 

बेस्टने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, दुकाने, कार्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक  ग्राहकांसाठी बेस्टने ६ टक्के कमी दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. 

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा प्रस्ताव मंजूर केल्यास मुंबईकरांच्या वीजबिलांमध्ये एप्रिल महिन्यापासून वाढ होऊ शकते. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा