मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शुभमंगल सावधान! लग्नाची घटिका समीप येताच वराचे कुटुंबीयांसह पलायन, पोलिसांकडून शोध सुरू

शुभमंगल सावधान! लग्नाची घटिका समीप येताच वराचे कुटुंबीयांसह पलायन, पोलिसांकडून शोध सुरू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 24, 2023 06:20 PM IST

Groom absconded with family : लग्नाला काही तासांचा वेळ शिल्लक असताना वराने कुटूंबासह पलायन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये लग्नाच्या काही तास आधी वराने पलायन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वराबरोबरच त्याचे संपूर्ण कुटूंब घराला टाळे ठोकून परागंदा झाले आहे. याची माहिती मिळताच वधूपक्षातील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.त्याचवेळी कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी पळून गेलेल्या वराचा आणि त्याच्या कुटुंबाचा शोध सुरू केला आहे.

हे प्रकरण लालौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे. महिन्याभरापूर्वी पोलिसात तक्रार देताना एका व्यक्तीने सांगितले की,गावातील एका मुलाने त्याच्या मुलीवर बलात्कार केला होता. यावर पोलिसांनी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून समजूत काढली. तरुणाच्या नातेवाईकांनी तरुणीशी लग्न करण्यास परवानगी दिली होती. दोघांच्या लग्नाची तारीख २३ जानेवारी निश्चित करण्यात आली होती.

दोन्ही बाजूच्या लोकांनी लग्नाची पूर्ण तयारी केली होती. वधूच्या दारात नातेवाईकही आले होते. स्वयंपाकासाठी मिठाईवालेही उपस्थित होते. दुपारी वधूपक्षाकडील सर्व तयारी झाली होती. त्याचवेळी त्यांना समजले की, घराला कुलूप लावून नवरदेव कुटुंबासह फरार झाला आहे. या बातमीने वधूच्या कुटूंबाला धक्का बसला. मुलीच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत नवरा मुलगा व त्याच्या कुटूंबीयांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस अधिकारी रवींद श्रीवास्तव यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग