मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Metro Fare Concession : मुंबईकरांना महाराष्ट्र दिनाची भेट! ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांगांना मेट्रो प्रवासात सवलत

Metro Fare Concession : मुंबईकरांना महाराष्ट्र दिनाची भेट! ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांगांना मेट्रो प्रवासात सवलत

Apr 29, 2023, 05:17 PM IST

  • Maharashtra Day Gift from Shinde Govt : मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Mumbai Metro

Maharashtra Day Gift from Shinde Govt : मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

  • Maharashtra Day Gift from Shinde Govt : मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Maharashtra Day Gift from Shinde Govt : शिंदे-फडणवीस सरकारनं सर्वसामान्यांवर सवलतींचा वर्षाव सुरूच ठेवला आहे. एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता मुंबई मेट्रोचा प्रवास सरकारनं स्वस्त केला आहे. मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election 2024 : महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला रवाना!

Mumbai Womens Abuses Police : मुंबईत तीन मद्यधुंद तरुणींची पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण, नेमकं प्रकरण काय?

Mumbai airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या आज ६ तास बंद राहणार, जाणून घ्या कारण

Weather Updates: विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आज अवकाळी पावसाची शक्यता, मुंबई आणि कोकणात उष्णता कायम

येत्या १ मे पासून अर्थात, महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व दिव्यांगांना तिकिटात २५ टक्के सवलत मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.

Bhiwandi Building Collapsed : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, ५० जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य जारी

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई-१ पासावर ही सवलत मिळेल.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केलं आहे. त्यामुळं त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणं आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे, तर महिलांना सुद्धा एसटी बसेसमधून ५० टक्के प्रवास सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळं मेट्रोची प्रवासी संख्या वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Samriddhi Expressway : समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात का होतात? अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर

कोणाला मिळणार सवलत?

  • ही सुविधा ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. सवलत घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
  • दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचं प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रं आवश्यक आहेत.
  • मेट्रो लाइन २ ए आणि ७ च्या मेट्रो स्थानकावरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकतील.
  • नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-१ कार्डवर देखील सवलत असेल. तसंच, याला ३० दिवसांची वैधता राहील. मुंबई १ कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरलं जाऊ शकतं व रिचार्जही करता येईल.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा