मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samriddhi Expressway : समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात का होतात? अध्ययनातून धक्कादायक वास्तव समोर..

Samriddhi Expressway : समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात का होतात? अध्ययनातून धक्कादायक वास्तव समोर..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 28, 2023 11:55 PM IST

SamriddhiexpresswayAccident : समृद्धी महामार्गवरील अपघातांना नेमकी कोणती कारणं जबाबदार आहे. समृद्धी महामार्गावर गाडी चालवताना कोणती काळजी घ्यायला हवी. याबाबत केलेल्या अध्ययनाचा निष्कर्ष समोर आला आहे.

Samriddhi expressway 
Samriddhi expressway 

Samruddhi MahamargAccident :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेसमृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या दरम्यान प्रवासासाठी लागणार वेळ कमी झाला आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावर प्रवास करणे चिंताजनक बनले आहे.

समृद्धी महामार्गवरील अपघातांना नेमकी कोणती कारणं जबाबदार आहे. समृद्धी महामार्गावर गाडी चालवताना कोणती काळजी घ्यायला हवी. समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत,याबाबत नागपुरातील व्हीएनआयटी (VNIT)संस्थेच्या सिव्हिल इंजीनियरिंग विभागाच्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांनी प्राध्यापक विश्रुत लांडगे त्यांच्या मार्गदर्शनात अभ्यास आणि संशोधन केलं आहे.

अपघाताचे मुख्य कारण -

समृद्धी महामार्गावरवरील अपघातासाठी'महामार्ग संमोहन'जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोणत्याच अडथळ्यांशिवाय जेव्हा एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो.त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक मिनिटे धावत असते.अशा परिस्थिती मध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते,तुमचा मेंदूदेखील क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला'महामार्ग संमोहन'असे म्हणतात. हा प्रकार समृद्धी महामार्गावर चालकांसोबत घडत आहे. समृद्धी महामार्गावर गाडी चालवतांना अनेक चालक हे'महामार्ग संमोहनाचे'बळी ठरले आहे.

समृद्धी महामार्गावर दिवसाला सरासरी९अपघात होतात. गेल्या तीन महिन्यात अपघातात ३७ मृत्यू झाले आहेत. गंभीर स्वरुपाचे११२अपघात झालेत. यात सकाळी ८ते१०दरम्यान३४टक्के अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तरHighway Hypnosisमहामार्ग संमोहनमुळे म्हणजे एकसारखे ड्रायव्हिंगमुळे३२टक्के अपघात झाल्यांचं नोंद झाली आहे. टायर फुटल्यामुळे ३४टक्के तर लेन चेंज करताना४०टक्के अपघात झाले आहे. चालकाचं लक्ष विचलित झाल्याने २४टक्के अपघात झाले असून यात८टक्के अपघात हे मोबाईल हाताळताना झाले असल्याची नोंद आहे.

अपघात टाळण्यासाठी उपाय -

-ड्रायव्हिंग करताना एकसुरीपणा टाळण्यासाठी ठिकाठिकाणी साईन बोर्ड,स्क्रीन डिस्प्ले लावणे

-वाहनांच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा असणं

-गाड्यांमध्ये समोरील एअर बलून बरोबर साइड सेफ्टी आवश्यक

-वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना उदा.सीसीटीव्ही,स्पीड कॅमेरा

IPL_Entry_Point

विभाग