मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayanraje On Sharad Pawar: उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचं नाव बदलून...

Udayanraje On Sharad Pawar: उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचं नाव बदलून...

Oct 03, 2022, 03:06 PM IST

    • Udayanraje On Sharad Pawar: उदयनराजे म्हणाले की, "रयत शिक्षण संस्थेच्या घटनेनुसार संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असायला हवा.
खासदार उदयनराजे

Udayanraje On Sharad Pawar: उदयनराजे म्हणाले की, "रयत शिक्षण संस्थेच्या घटनेनुसार संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असायला हवा.

    • Udayanraje On Sharad Pawar: उदयनराजे म्हणाले की, "रयत शिक्षण संस्थेच्या घटनेनुसार संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असायला हवा.

Udayanraje On Sharad Pawar: रयत शिक्षण संस्थेवरून खासदार उदयनराजे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केलीय. शरद पवारांवर निशाणा साधताना उदयनराजे यांनी म्हटलं की, "रयत शिक्षण संस्थेचं नाव बदलून आता पवार शिक्षण संस्था करा." यावेळी उदयनराजे यांनी रयत शिक्षण संस्थेत सुरु असलेल्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

उदयनराजे म्हणाले की, "रयत शिक्षण संस्थेच्या घटनेनुसार संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असायला हवा. पण तसं होत नाहीय. रयत शिक्षण संस्थेतील संचालकांचे योगदान काय? रयतमध्ये सुरु असलेल्या कारभारावर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आवाज उठवायला हवा."

रयत शिक्षणसंस्था बळकावल्याचा आरोपही उदयनराजेंनी केला. त्यांनी म्हटलं की, मी लहान असताना जागा दिली, तेव्हा मला काही कळत नव्हतं. राज्याचा मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असो तो संस्थेचा अध्यक्ष असतो. असं काय घडलं की बदल करण्यात आला, हा कुणी केला? सगळं ओरबाडून घ्यायची लोकांना सवयच लागलीय, पण किती? असा प्रश्नही उदयनराजेंनी केला. काहीही योगदान नसलेल्यांना तुम्ही संस्थेत घेतलंत. मला घेऊ नका, मला करण्यासाठी खूप आहे. पण हे घेणारे कोण? आम्ही दिलं आहे, यांनी काही दिलं नाही उलट ओरबाडलं असल्याची टीकाही उदयनराजेंनी केली.

रयतचं ननाव बदलून टाका, रयत म्हणजे सर्वसामान्यांची संस्था, सख्या ज्याची जास्त ते लागू करा इथे. संख्या जास्त कुणाची? पवार कुटुंबाची. मग पवार शिक्षण संस्था असं नाव द्या. कर्मवीर भाऊरावांच्या कुटुंबाचा वारसा सांगता, तर त्यांनीही थोडं बोलायला हवं असं म्हणत उदयनराजे यांनी पवार कुटुंबावर टीका केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा