मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray Dussehra Melava : दसरा मेळावा वादात मनसेची उडी.. राज ठाकरे यंदा दसरा मेळावा घेणार?

Raj Thackeray Dussehra Melava : दसरा मेळावा वादात मनसेची उडी.. राज ठाकरे यंदा दसरा मेळावा घेणार?

Sep 02, 2022, 07:24 PM IST

    • दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर आपणच दसरा मेळावा घेणार, अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेही दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत आहेत. यातच आता या वादात मनसेनेही उडी घेतली आहे.
राज ठाकरे यंदा दसरा मेळावा घेणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर आपणच दसरा मेळावा घेणार, अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेही दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत आहेत. यातच आता या वादात मनसेनेही उडी घेतली आहे.

    • दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर आपणच दसरा मेळावा घेणार, अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेही दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत आहेत. यातच आता या वादात मनसेनेही उडी घेतली आहे.

मुंबई – शिवसेना व दसरा मेळावा हे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार दशकांपासून अतूट समीकरण बनले आहे. शिवाजी पार्क (शिवतीर्थ) वर शिवसेनेचा दरवर्षी दसरा मेळावा साजरा केला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा अजूनपर्यंत सुरू आहे. मात्र शिवसेनेत फूट पडल्याने यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार का?झाल्यास कुठला गट शिवसेना मेळावा घेणार?मुंबई महापालिका दसरा मेळाव्यासाठी परवानगी देणार का?याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Pune Lohegaon News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर आपणच दसरा मेळावा घेणार, अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली आहे. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची खरी शिवसेना आम्हीच आहोत,असा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत चाचपणी सुरू केल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना कुणाची याचा वाद सर्वोच्च न्यायालयात व निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना तसेच दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू असताना या वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचे आयोजन करावं. त्यांनीच राज्यातील हिंदू जनतेला मार्गदर्शन करावं,अशी विनंती महाराष्ट्र सैनिकांकडून करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलं आहे. यावर राज ठाकरे काय निर्णय घेणार?याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

पत्रात संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की,बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार असं म्हणत'यू टर्न'आणि'बंडखोर'असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगते ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता त्यापैकी कुणातच नाही. ज्या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील मराठी भूमिपूत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची,तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टाचा विषय ठरत आहे,याहून मोठी शिकांतिका ती कोणती?"

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे,मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे,ती म्हणजे आपण. हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची,महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की,दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला,प्रत्येक मराठी मार्गाला मार्गदर्शन करावे,",असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं.