मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MHT CET 2023 परीक्षेसाठी वेबसाईट लाँच; कधी होणार कोणती परीक्षा? वाचा सविस्तर

MHT CET 2023 परीक्षेसाठी वेबसाईट लाँच; कधी होणार कोणती परीक्षा? वाचा सविस्तर

Jan 27, 2023, 08:33 PM IST

  • Mht CET 2023 exam website launched : महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षासाठी अधिकृत संकेतस्थळ लाँच करण्यात आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने हे संकेतस्थळ सुरू केले आहे.

MHT CET 2023 

Mht CET 2023 exam website launched : महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षासाठी अधिकृत संकेतस्थळ लाँच करण्यात आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने हे संकेतस्थळ सुरू केले आहे.

  • Mht CET 2023 exam website launched : महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षासाठी अधिकृत संकेतस्थळ लाँच करण्यात आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने हे संकेतस्थळ सुरू केले आहे.

मुंबई - महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) २०२३ साठी अधिकृत संकेतस्थळ सुरू झाले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने हे संकेतस्थळ सुरू केले आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करणे आणि सर्व सामायिक  परीक्षांसाठी कट ऑफ तपासणे, स्कोअरकार्ड डाऊनलोड करणे आदि प्रक्रिया यापुढे cetcell.mahacet.org या नवीन अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून केली जाईल. 

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात अभियांत्रिकी, कृषी आणि फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा ९ मे ते २० मे दरम्यान होणार आहे. पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गटासाठी एमएचटी सीईटी  ९, १०,  ११  मे रोजी होणार आहे. PCB (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गटाची परीक्षा  १५, १६,  १७, १८, १९ आणि २० मे रोजी होणार आहे. महाराष्ट्र CET सेल हॉस्पिटॅलिटी, मॅनेजमेंट, आणि इतर पदवीपूर्व आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा देखील घेते.

अधिकृत वेबसाइटसह, CET सेलने वैद्यकीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि उच्च शिक्षण परीक्षांसाठी MHT CET अभ्यासक्रम देखील जाहीर केला आहे. MAH-LLB (५ वर्षे) चाचणी देखील CET सेलद्वारे २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या पूर्ण वेळापत्रकासाठी उमेदवार cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाचा संदर्भ घेऊ शकतात.

राज्य CET सेल महाराष्ट्राने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेश परीक्षा MAH MBA/MMS CET २०२३, MAH LLB (५ वर्षे) CET २०२३, MHT CET २०२३, MAH LLB (३ वर्षे)  CET २०२३ आणि इतर अनेकांसाठी अभ्यासक्रमनिहाय अभ्यासक्रम जारी केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा