मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मुलीला प्रियकरासोबत शेतात पाहून वडिलांचे सटकलं डोकं; केलं भयंकर कांड, पोलीसही चक्रावले

मुलीला प्रियकरासोबत शेतात पाहून वडिलांचे सटकलं डोकं; केलं भयंकर कांड, पोलीसही चक्रावले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2023 08:00 PM IST

मुलीला प्रियकरासोबत पाहिल्याने वडिलांनी मुलीच्या डोक्याने लाकडी दांडक्याने प्रहार करून तिला बेशुद्ध केले. नंतर तिला जिवंतच पोत्यात भरून तलावात फेकून तिची हत्या केली.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यूपीच्या शाहजहांपूर जिल्ह्यात पोलिसांनी १२वीत शिकणाऱ्या एका मुलीच्या हत्येचा खळबळजनक खुलासा केला आहे. १२ वीत शिकणारी विद्यार्थिनी प्रियकराला भेटायला गेली असता मागून तिचे वडीलही पोहोचले. दोघांना एकत्र पाहून संतापलेल्या पित्याने मुलीच्या डोक्यात काठीने जोरदार प्रकार केला. यात ती बेशुद्ध झाली. त्यानंतर प्रियकर घटनास्थळावरून पळून गेला. मुलगी मेली असा विचार करून वडील तेथून घरी गेले व दुसऱ्या दिवशी घटनास्थळी पुन्हा परतले. अर्चना असे मृत मुलीचे नाव आहे.

मुलगी मृत झाल्याचे समजून तिला एका गोणीत टाकून तिला एका मंदिराजवळच्या तलावात फेकले. मात्र मुलगी त्यावेळी जिवंत होती. आणि पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. 

पोलिसांच्या चौकशीत मुलीचे वडील सुखलाल यांनी संपूर्ण घटनेची कबुली दिली. मुलीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने त्याने मुलीची हत्या केल्याचे कबुल केले. १० जानेवारी रोजी मुलगी अर्चना प्रियकराला भेटण्यासाठी गेली असता मागून आलेल्या सुखलालने मुलीची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह रामनगर ते दौरिया गावादरम्यान मंदिराजवळच्या तलावात टाकला. 

सुखलालने पोलिसांना सांगितले होते की, त्यांची मुलगी अर्चना १० जानेवारी रोजी कोरोकुईयन येथील ईडन पब्लिक स्कूलमध्ये गेली होती, तिने कोचिंगला जाण्याचेही बोलले होते, परंतु ती परत आली नाही. सुखलाल यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद केली नव्हती. २३ जानेवारी रोजी अर्चनाचा मृतदेह छोट्या पोत्यात आढळला तेव्हा सुखलाल यांनी आरोप केला की जर पोलिसांनी तिच्या मुलीच्या हरवल्याची तक्रार नोंदवली असती तर अर्चनाचा जीव वाचला असता. यादरम्यान पोलिसांनी सुखलालला अर्चनाच्या हत्येप्रकरणी कुणावर संशय असल्याबाबत विचारणा केली असता सुखलालने आपले कोणाशीही वैर नाही, कोणावरही संशय नसल्याचे सांगितले. 

अर्चनाच्या मोबाईलचा सीडीआर काढल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. इकडे  २४  जानेवारीला शवविच्छेदनानंतर अर्चनाचा मृतदेह घरी नेण्यात आला तेव्हा सुखलालने मृतदेह दफन करण्यास नकार दिला. गावातील एका तरुणाने आपल्या मुलीची हत्या केली असून, त्याला अटक करून तुरुंगात पाठवा, अशी मागणी तो करू लागला. आजपर्यंत सुखलाल कुणावरही संशय व्यक्त करत नव्हता, अचानक तरुणाच्या अटकेची मागणी का करू लागला, या मागणीने पोलीस चक्रावून गेले.

कोतवाल महेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखलालने आपल्या मुलीला गावातील एका तरुणासोबत शेतात पकडले होते, त्यानंतर रागाच्या भरात सुखलालने अर्चनाला बेदम मारहाण केली आणि तिच्या डोक्यात काठीने वार केले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. आणि सुखलाल तेथून निघून गेला. बऱ्याच दिवसांनी सुखलाल गेला आणि अर्चना तिथे पडलेली दिसली, मग त्याने अर्चनाला एका गोणीत बंद केले आणि नंतर तिला तलावात फेकून दिले आणि निघून गेला.

अर्चनाच्या हत्येप्रकरणी तिचे वडील सुखलाल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, त्यांनी ही हत्या केल्याचे मान्य केले आहे. अजून कोणी यात सामील आहे का, याबाबत तपास सुरू आहे. 

IPL_Entry_Point

विभाग