मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Satara: प्रेयसीला भेटायला बुरखा घालून गेला, मुलं चोरणारा समजून लोकांनी बदडलं

Satara: प्रेयसीला भेटायला बुरखा घालून गेला, मुलं चोरणारा समजून लोकांनी बदडलं

Oct 01, 2022, 01:47 PM IST

    • Satara: प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क बुरखा घालून आला होता. मात्र त्याची ही शक्कल त्याला महागात पडली आहे.
साताऱ्यात बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण

Satara: प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क बुरखा घालून आला होता. मात्र त्याची ही शक्कल त्याला महागात पडली आहे.

    • Satara: प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क बुरखा घालून आला होता. मात्र त्याची ही शक्कल त्याला महागात पडली आहे.

Satara: सध्या राज्यात मुलं चोरणारी टोळी फिरतेय अशी अफवा पसरली आहे. या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यातच एखाद्या संशयास्पद फिरताना दिसला तर त्याला मारहाणीचे प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सांगलीत साधूंना मारहाण झाली होती. आता साताऱ्यात एका प्रियकराला बदडण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क बुरखा घालून आला होता. मात्र त्याची ही शक्कल त्याला महागात पडली आहे. लोकांनी त्याला मुलं चोरणारा समजून बदडला आहे. प्रेयसी आणि हा प्रियकर दोघेही विवाहीत असल्याची माहितीसुद्धा समोर येतेय.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुरखा घालून एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसली. जेव्हा चौकशी केली तेव्हा ती महिला नसल्याचं समजताच लोकांनी त्याला पकडलं. त्यानंतर मुलं चोरणारा असल्याचं समजून बेदम चोपही दिला गेला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

साताऱ्यात तामजाईनगरमध्ये ही घटना घडली. बुरखा घालून आलेली व्यक्ती शाळेचं नाव विचारत होता. तेव्हा दुकानदाराला संशय आल्यानंतर त्याला पकडलं तेव्हा तो पुरुष असल्याचं समजलं. त्यानंतर मुलं पळवून नेणारा असावा या संशयातून त्याला मारहाण केली गेली. मारहाणीनंतर लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. तिथं पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा आपण प्रेयसीला भेटायला आल्याचं सांगितलं. दोघेही विवाहीत असल्यानं प्रेयसीची भेट घेण्यासाठी तो बुरखा घालून आला होता. मात्र हे करणं त्याच्या अंगलट आलं.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा