मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PFI च्या हिटलिस्टवर RSSचे नेते, मोदी सरकार देणार Y सुरक्षा

PFI च्या हिटलिस्टवर RSSचे नेते, मोदी सरकार देणार Y सुरक्षा

Oct 01, 2022, 12:50 PM IST

    • RSS Leader In PFI Hitlist: एनआयएच्या अहवालात आणखी एक माहिती उघड झाली आहे, त्यानुसार पीएफआयकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच नेत्यांच्या जीवाला धोका आहे.
पीएफआय (HT_PRINT)

RSS Leader In PFI Hitlist: एनआयएच्या अहवालात आणखी एक माहिती उघड झाली आहे, त्यानुसार पीएफआयकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच नेत्यांच्या जीवाला धोका आहे.

    • RSS Leader In PFI Hitlist: एनआयएच्या अहवालात आणखी एक माहिती उघड झाली आहे, त्यानुसार पीएफआयकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच नेत्यांच्या जीवाला धोका आहे.

RSS Leader In PFI Hitlist: केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पीएफआयवर पाच वर्षांच्या बंदीची कारवाई कऱण्यात आली आहे. आता एनआयएच्या अहवालात आणखी एक माहिती उघड झाली आहे, त्यानुसार पीएफआयकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच नेत्यांच्या जीवाला धोका आहे. या नेत्यांना आता केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. एनआयएने छापा टाकला तेव्हा केरळमधील पीएफआय सदस्य मोहम्मद बशीर याच्या घरी एक यादी सापडली. त्यामध्ये पीएफआयच्या रडारवर असणाऱ्या पाच आरएसएस नेत्यांची नावे होती.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयवर बंदी घातल्यानंतर केरळमधील पाच आरएसएस नेते पीएफआयच्या हिटलिस्टवर आहेत. याबाबतची माहिती एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारने निर्णय घेतला.

केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयए आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालाच्या आधारे केरळमधील पाच आरएसएस नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय़ घेतला आहे. आरएसएस नेत्यांच्या सुरक्षेसाठी अर्धसैनिक बलातील कमांडो तैनात करण्यात येतील.

आरएसएस नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी एकूण ११ कर्मचारी शिफ्टमध्ये काम करतील. या नेत्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय गुप्तचर संघटनेच्या अहवालाच्या आधारे घेतला आहे. केंद्र सरकारने बुधवारी पीएफआय आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सुरक्षा आणि दहशतवादाशी संबंध असल्याचा ठपका ठेवत पाच वर्षांची बंदी घातली आहे.

विभाग

पुढील बातम्या