मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Local Elections: भाजपला टक्कर देण्यासाठी पवारांचा प्लॅन.. काँग्रेस-शिवसेनेला साद

Local Elections: भाजपला टक्कर देण्यासाठी पवारांचा प्लॅन.. काँग्रेस-शिवसेनेला साद

Jul 12, 2022, 04:43 PM IST

    • भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार, अशी घोषणा पवारांनी केली आहे. तसंच, आमदार फुटले असले तरी शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबतच आहेत, असंही पवार म्हणाले.
शरद पवार

भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार,अशी घोषणा पवारांनी केली आहे. तसंच,आमदार फुटले असले तरी शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबतच आहेत,असंही पवार म्हणाले.

    • भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार, अशी घोषणा पवारांनी केली आहे. तसंच, आमदार फुटले असले तरी शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबतच आहेत, असंही पवार म्हणाले.

मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना हाताशी धरून महाआघाडीचे सरकार उलथवून टाकले व भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी, भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी (MVA Government) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार, अशी घोषणा पवारांनी केली आहे. तसंच, आमदार फुटले असले तरी शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबतच आहेत, असंही पवार म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ICSE Result 2024 : ठाण्यातील रेहान सिंह बारावी ICSE बोर्डात भारतात पहिला, केवळ एका गुणाने हुकले १०० टक्के

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत आज (मंगळवार) बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व आमदार हजर होते. या बैठकीनंतर हेमंत तपासे यांनी माध्यमांना माहिती दिली

पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रामध्ये सत्ता गेली तरी फरक पडत नाही. निवडणुकांसाठी आमचे कार्यकर्ते तयार आहे.  ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये विरोधी पक्ष म्हणून आम्ही आग्रही भूमिका घेणार आहोत, असं हेमत तपासे यांनी सांगितलं.

भाजपला दूर ठेवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत.  उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. आज आमदार जरी विभागले गेले असले तरी कार्यकर्ते तळागळातील शिवसैनिक ठाकरे सोबत आहेत, असंही पवारांनी सांगितलं.

आव्हाडांकडून उद्धव ठाकरेंवर टीका -

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरू असताना  जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले होते. मुख्यमंत्री झाल्यापासून माझी आणि त्यांची भेट झाली नव्हती.  माझ्या भागातील विकासकामांसाठी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. आधीच्या मुख्यमंत्र्यांचा पुरेसा वेळ मला मिळाला नाही, असं म्हणत आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

 

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा