मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain : राज्यात पावसाचं धूमशान; नाशिकमध्ये वाहने बुडाली, ५ दिवस अलर्ट

Maharashtra Rain : राज्यात पावसाचं धूमशान; नाशिकमध्ये वाहने बुडाली, ५ दिवस अलर्ट

Aug 07, 2022, 09:02 PM IST

    • दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवस पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 
राज्यात पावसाचं धूमशान

दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवस पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

    • दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवस पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने  महाराष्ट्रात जोरदार पुनरागमन केल्याने बळीराजा पुन्हा चिंताक्रांत झाला आहे. पुढील पाच दिवस अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन दिवस महत्वाचे आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात पूरपरिस्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  मुंबई, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

नाशिकमध्ये कार व रिक्षा नदीत बुडाली..

शहर आणि परिसरात आज पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी, म्हसरूळ, ओझर, आडगाव य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाधाडी) ला पूर आला. पुराचे पाणी गाडगे महाराज पुलाखाली वेगाने आले. यामुळे नदीपात्रात उभ्या असलेल्या काही वाहनांपैकी दोन रिक्षा एक कार, पाण्यात वाहून गेली. दरम्यान, नागरिकांनी आणि स्थानिक जीवरक्षक दलांनी पाण्यात प्रवेश करून पाण्यात वाहून जाणारी एक रिक्षा बाहेर काढली. मात्र एक रिक्षा आणि कार गाडगे महाराज पुलाखाली नदीपात्रात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उसंत घेतलेली होती. पण दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर मुसळधार कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

पुढील दोन दिवस महत्वाचे -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्याचा दिवस हा पावसासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनंतर प्रशासनही सतर्क झालं आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढताना दिसतोय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ९  ऑगस्टपासून ऑरेंज अलर्ट असणार आहे. याचा पण पाऊस कोसळत राहणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र थोडीसी परिस्थिती वेगळी असणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्यासाठी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर त्यापुढच्या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.