मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मनसेचे आता चलो पुणे.. औरंगाबादनंतर राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार

मनसेचे आता चलो पुणे.. औरंगाबादनंतर राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार

May 16, 2022, 05:47 PM IST

    • हनुमान चालिसा व मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्याबरोबर संपूर्ण देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबई, ठाणे व औरंगाबादनंतर पुण्यात सभा होत आहे. या सभेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला कसे उत्तर देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
मनसे प्रमुख राज ठाकरे

हनुमान चालिसा व मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्याबरोबर संपूर्ण देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबई, ठाणे व औरंगाबादनंतर पुण्यात सभा होत आहे. या सभेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला कसे उत्तर देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

    • हनुमान चालिसा व मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्याबरोबर संपूर्ण देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबई, ठाणे व औरंगाबादनंतर पुण्यात सभा होत आहे. या सभेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला कसे उत्तर देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

पुणे -मनसेचा गुढीपाडवा मेळावा व त्यानंतर राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तर सभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. हनुमान चालिसा व मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यांवरून राज यांनी उद्धव ठाकरे सरकारला आव्हान दिले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी बीकेसीतील मास्टर सभेत राज यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला होता. याला उत्तर देण्यासाठी व पुढील रणनिती ठरवण्यासाठी मनसेकडून पुण्यात राज ठाकरेंच्या सभेची तयारी सुरू करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Onion Export: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ९९,१५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Mumbai-Pune Expressway Bus Fire: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या (एस पी कॉलेज) मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. पुण्यात होणाऱ्या या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

<p>मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना सभेच्या परवानगीसाठी पत्र लिहिले आहे.</p>

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहे. औरंगाबाद येथे झालेल्या सभेतच राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुढील सभेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. २१ ते २८ मे च्या दरम्यान ही सभा पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिले आहे.

राज ठाकरे यापुढे सर्व सभा मराठवाड्यात घेणार आहे. विदर्भ,कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातहीराज यांच्यासभाहोणार आहेत.मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. काहींना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतंय,असा टोलाही त्यांनी लगावला. शिवाय राज ठाकरेंवर टीका करताना त्यांनी मुन्नाभाईचं उदाहरण दिलं. सिनेमातल्या मुन्नाभाईच्या डोक्यात केमिकल लोचा होता,तसंच इथेही झालाय,असं ते म्हणाले. त्यामुळे या टीकेला राज ठाकरे काय उत्तर देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंआहे.