मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Karnataka border Dispute : कर्नाटक सरकारविरोधात महाआघाडीचा एल्गार; शनिवारी कोल्हापुरात आंदोलन

Karnataka border Dispute : कर्नाटक सरकारविरोधात महाआघाडीचा एल्गार; शनिवारी कोल्हापुरात आंदोलन

Dec 07, 2022, 07:05 PM IST

  • mva morcha against Karnataka government : कर्नाटक सरकारच्या हिंसक कृतीविरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शनिवारी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे. 

Karnataka border Dispute

mva morcha against Karnataka government : कर्नाटक सरकारच्या हिंसक कृतीविरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शनिवारी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे.

  • mva morcha against Karnataka government : कर्नाटक सरकारच्या हिंसक कृतीविरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शनिवारी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे. 

Maharashtra Karnataka border dispute : कर्नाटककडून सीमाभागात मराठी नागरिकांवर हल्ले होत असून वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याने वादाला तोंड फोडले आहे. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीने कोल्हापुरात एल्गार पुकारला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत कर्नाटक सरकारचा निषेध करत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसकडून शनिवारी (१० डिसेंबर) कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात असून सर्वांना शाहू महाराजांच्या समाधीजवळ जमा होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना देखील निमंत्रित केलं जाणार आहे.

बेळगावजवळ बागेवाडी टोलनाक्याजवळ कन्नडिंगांनी धूडघूस घातला. यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी कर्नाटकविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बेळगावातील सीमावासीयांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आदींसह अन्य नेते उपस्थित होते.