मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पोहोचला लोकसभेत, सुप्रिया सुळे व विनायक राऊत आक्रमक

Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पोहोचला लोकसभेत, सुप्रिया सुळे व विनायक राऊत आक्रमक

Dec 07, 2022, 04:12 PM IST

  • Maharashtra Karnataka border dispute in loksabha : महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद आज लोकसभेत उमटले. कर्नाटककडून सुरू असलेल्या दडपशाहीविरुद्ध राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

विनायक राऊत व सुप्रिया सुळे

Maharashtra Karnataka border dispute in loksabha : महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद आज लोकसभेत उमटले. कर्नाटककडून सुरू असलेल्या दडपशाहीविरुद्ध राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

  • Maharashtra Karnataka border dispute in loksabha : महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद आज लोकसभेत उमटले. कर्नाटककडून सुरू असलेल्या दडपशाहीविरुद्ध राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

Maharashtra Karnataka Dispute : महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद पुन्हा चिघळला असून मंगळवारी बेळगावजवळ हिरे बागेवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करत नासधूस केली. याचे पडसाद आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेत कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला. यावर कर्नाटकच्या खासदारांनी आक्षेप घेतल्यानंतर सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मागील १० दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटकात संघर्ष पाहायला मिळत आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडून बेताल वक्तव्याने वाद सुरू झाला असून महाराष्ट्रातील नागरिकांना बेळगावच्या सीमेवर मारहाण करण्यात आली आहे. महाराष्ट्र संयम राखून आहे, मात्र नागरिकांना झालेली मारहाण सहन करणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आपला मुद्दा मराठीत उपस्थित करताना म्हटले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अत्याचार, दडपशाही सुरू आहे. एका राज्याच्या मंत्र्यांना प्रवेश करण्यास मनाई केली केली. अशी बंदी घालणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्राच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभेत गदारोळ झाला. यावर कर्नाटकच्या खासदारांनी आक्षेप घेतल्याने जोरदार खडाजंगी झाली.

 

पुढील बातम्या