मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Soni Murder Case : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या भंडाऱ्याच्या सोनी हत्याकांडातील आरोपींना नऊ वर्षानंतर जन्मठेप

Soni Murder Case : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या भंडाऱ्याच्या सोनी हत्याकांडातील आरोपींना नऊ वर्षानंतर जन्मठेप

Apr 12, 2023, 08:58 AM IST

    • Bhandaara Soni Murder Case: भंडाऱ्याच्या तुमसर येथे २०१४ मध्ये सोनी हत्याकांड झाले होते. या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. या हत्याकांडाचा निकाल आज लागला असून सात आरोपींना न्यायालयानं जन्मठेप सुनावली आहे.
Bhandaara Soni Murder Case

Bhandaara Soni Murder Case: भंडाऱ्याच्या तुमसर येथे २०१४ मध्ये सोनी हत्याकांड झाले होते. या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. या हत्याकांडाचा निकाल आज लागला असून सात आरोपींना न्यायालयानं जन्मठेप सुनावली आहे.

    • Bhandaara Soni Murder Case: भंडाऱ्याच्या तुमसर येथे २०१४ मध्ये सोनी हत्याकांड झाले होते. या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. या हत्याकांडाचा निकाल आज लागला असून सात आरोपींना न्यायालयानं जन्मठेप सुनावली आहे.

भंडरा: भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे सोनी यांच्या घरावर दरोडा टाकत तिघांची हत्या करण्यात आली होती. तसेच दीड कोटी रुपयांचा एवज लंपास करण्यात आला होता. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर तब्बल ९ वर्षांपासून खटला सुरू होता. यातील सातही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.अस्मर यांनी हा निकाल दिला.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur Accident: भरधाव कार झाडावर आदळून नदीत बुडाली, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूर येथील घटना

Navi Mumbai: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून मुलीचे अश्लील फोटो केले व्हायरल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या कांदिवली येथील खासगी रुग्णालयाला आग, ४ जण होरपळले

भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात २६ फेब्रुवारी २०१४ रोजी येथील सोने-चांदी आणि हिऱ्याचे व्यापारी संजय सोनी, त्यांची पत्नी पूनम आणि बारा वर्षीय मुलगा धृमील यांची निर्घृणपणे हत्या करून घरातील तिजोरीतील सुमारे पाच कोटींच्या दागिन्यांसह इतर एवज दरोडे खोरांनी लुटून नेला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींना अटक केली होती. त्यांच्यावर भंडारा सत्र न्यायल्यात खटला चालवण्यात आला. तब्बल ९ वर्ष हा खटला चालला. अखेर ९ वर्षांनी या प्रकरणी आरोपींना शिक्षा देण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला. विश्वासू चालकानेच सोनी कुटुंबाचा घात केल्याचे तपसात सिद्ध झाले. या प्रकरणी २७५ पानांचे निकालपत्र तयार करण्यात आले तर ८०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आला.

निकाल लागताच मुलीच्या अश्रूंचा बांध फुटला

न्यायाधीशांनी निकाल देतांना सोनी यांची मुलगी हिरण ही देखील यावेळी उपस्थित होती. न्यायाधीशांनी निकाल देताच हिरणच्या आई वडील आणि भावाच्या आठवनीने अश्रूचा बांध फुटला. यावेळी उपस्थितांचे डोळे देखील पाणावले.

हत्या झालेल्या धृमीलचा आज वाढदिवस

या तिहेरी हत्याकांडात ज्या निरागस धृमीलची हत्या झाली, त्याचा आज जन्मदिवस आहे. धृमीलच्या जन्मदिनी हा निकाल लागला. यामुळे आई - वडिलांच्या आत्म्याला शांती लाभली असेल अशी प्रतिक्रिया मुलगी हिरणने दिली.

असे झाले होते हत्याकांड

तुमसर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी संजय सोनी (वय ४२), त्यांची पत्नी पूनम सोनी (वय ४०) आणि बारा वर्षीय मुलगा धृमिल सोनी यांची अत्यंत निर्घृणपणे त्यांचा चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यानं हत्या केली होती. या हत्याकांडानंतर आरोपींनी सोनी यांच्या घरातील आजच्या बाजार भावानुसार सुमारे पाच कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने चोरण्यात आले होते. सोनी हे २६ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांच्या चालकासह वाहनाने गोंदिया येथे सोने आणि चांदी खरेदी आणि विक्रीसाठी गेले होते. तिथून परत येत असताना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिरसी फाट्यावर चालकाने संजय सोनी यांचा नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून हत्या केली. त्यानंतर वाहनामध्ये मृतदेह टाकून चालक घरी पोहोचला. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाने सुनी यांची पत्नी पूनम आणि मुलगा धृमील यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करून दागिने लंपास केले होते. या हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा