मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rain alert in Pune: पुणे, नाशिक, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Rain alert in Pune: पुणे, नाशिक, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Apr 11, 2023 10:56 PM IST

Thunderstorm with lightning and rain alert: राज्यात गेले अनेक दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाचे थैमान सुरू असताना आता पुणे, नाशिक आणि बीड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुणे, नाशिक, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
पुणे, नाशिक, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

राज्यात गेले अनेक दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाचे थैमान सुरू असताना आता पुणे, नाशिक आणि बीड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रती तास अशा जोरदार वेगाचे वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने मंगळवारी रात्री जारी केलेल्या हवामानाच्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रविवारी झालेल्या पावसामुळे अहमदनगर, धाराशीव, नाशिक जिल्ह्यात मोठं नुकसान

रविवार, ९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अहमदनगर, धाराशीव आणि नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. येथे अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी आणि मंगळवारी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या