मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Monsoon Assembly Session : पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून नागपुरात

Monsoon Assembly Session : पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून नागपुरात

Aug 25, 2022, 10:18 PM IST

    • १७ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. पुढील हिवाळी अधिवेशन सोमवार, १९ डिसेंबर पासून नागपूर येथे होणार आहे.
पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले

१७ऑगस्ट पासून सुरू झालेल्याविधीमंडळाच्यापावसाळी अधिवेशनाचे आजसूप वाजले. पुढील हिवाळी अधिवेशन सोमवार,१९डिसेंबर पासून नागपूर येथेहोणारआहे.

    • १७ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. पुढील हिवाळी अधिवेशन सोमवार, १९ डिसेंबर पासून नागपूर येथे होणार आहे.

Monsoon Assembly session :  १७ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये सभागृहातील जुगलबंदी, शिंदे गटाच्या आमदारांविरोधात झालेली घोषणाबाजी तसेच विधीमंडळाच्या पायऱ्यावर एकमेकांना भिडलेले सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार यामुळे अधिवेशन खूपच चर्चेत राहिले. पुढील हिवाळी अधिवेशन सोमवार, १९ डिसेंबर पासून नागपूर येथे होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

आज पावसाळी अधिवेशनाचा समारोप करताना पुढील हिवाळी अधिवेशन परंपरेप्रमाणे नागपूरला होत आहे. महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन सलग दोन वर्षे मुंबईत घेण्यात होते. मात्र यंदा ते पूर्वीप्रमाणे नागपूरला घेण्याची घोषणा करण्यात आली. 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्दांवर घेरत चांगलेच जेरीस आणले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात आपल्यावर केलेल्या सर्व आरोपांना उत्तर देत सर्वांवर निशाणा साधला. 

विधिमंडळाचं यंदाचं अधिवेशन जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे अधिक गाजले. आमदारांनी एकमेकांना केलेली धक्काबुक्की महाराष्ट्राच्या इतिहासातील अभूतपूर्व अशी घटना होती. सोशल मीडियावरही यावर टीका सुरू होती..

होय मी कंत्राटी मुख्यमंत्री- एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले की,  घटनात्मक तरतुदी पूर्ण करुनही मुख्यमंत्री हे कंत्राटी वाटत असेल तर आपण कंत्राटी मुख्यमंत्री आहे. राज्यातील जनतेच्या विकासाचं कंत्राट आपण घेतलंय.  बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पुढे नेण्याचं कंत्राट आपण घेतल्याचं शिंदे यांनी म्सांहटले. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं आणि अश्रू पुसण्याचं, लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचं कंत्राट आपण घेतलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. त्याचबरोबर आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस नेते, राष्ट्रवादीेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला.