मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava: मोदींना सांगायला हवं, पंकजा मुंडेंच्या एका ट्विटवर लाखो लोक येतात - महादेव जानकर

Dasara Melava: मोदींना सांगायला हवं, पंकजा मुंडेंच्या एका ट्विटवर लाखो लोक येतात - महादेव जानकर

Oct 05, 2022, 03:45 PM IST

    • Dasara Melava: पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी सुजय विखे पाटील यांनी प्रयत्न करावा असंही महादेव जानकर यांनी म्हटलं.
महादेव जानकर

Dasara Melava: पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी सुजय विखे पाटील यांनी प्रयत्न करावा असंही महादेव जानकर यांनी म्हटलं.

    • Dasara Melava: पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी सुजय विखे पाटील यांनी प्रयत्न करावा असंही महादेव जानकर यांनी म्हटलं.

Dasara Melava: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा घेतला. या मेळाव्याला खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे पाटील, शिवाजी कर्डिले, महादेव जानकर हे नेते उपस्थित होते. महादेव जानकर यांनी मेळाव्याला आलेली लोकं पैसे देऊन नाही तर पदरमोड करून आल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, मी भाजपचा माणूस नाही तर मित्रपक्ष आहे. जर पंकजा मुंडे आणि महादेव जानकर नसेल तर तुमचं काही खरं नाही. माझी सुजय विखे आणि प्रीतम मुंडेंना विनंती आहे की, तुम्ही दिल्लीचे, खासदार इथं आहात, तुम्ही आमचे शब्द दिल्लीला घेऊन जा.

ट्रेंडिंग न्यूज

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Mumbai Accident : रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ट्रकनं चिरडलं; मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील घटना

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

मेळाव्याला आलेली माणसं ही पैसे देऊन आलेली नाहीयेत. ती आपली पदरमोड करून इथं आली आहेत. काही मुंबईवरून तर काही गुजरातवरून आले आहेत असंही महादेव जानकर म्हणाले. सुजय विखे पाटील यांचे नाव घेत महादेव जानकर यांनी म्हटलं की, तुम्ही दिल्लीत असता, तर मोदींना सांगायला हवं की, पंकजा मुंडेंच्या एका ट्विटवर लाखो लोक गोळा होतात. मंत्रिमंडळात त्यांना स्थान द्यायचा प्रयत्न करावा. असं केलं तर विखेंचाच पक्ष मोठा होईल. प्रीतम मुंडेंनीही सांगावं की आम्ही इथं उभा आहे म्हणून तुम्ही दिल्लीतील माणसं आहात, तुम्ही दोघं खासदार आहात.

पंकजा मुंडे यांनी नाराजीच्या चर्चेवर मौन सोडलं असून त्यांनी म्हटलं की, इथं कुणीही नाराज नाहीय. कोणाची अवहेलना, अपमान करू नका. माझी ही इच्छा आहे. इतके दिवस मी मौन बाळगलं कारण माझा तसा स्वभाव नाही. नाराजीचा विषय माझ्याकडून संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील आपण २०२४ च्या तयारीला लागायला हवं असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की मी तुमच्यासाठी रोज मैदानात असेन. गोपीनाथ मुंडेंच्या नावाला बट्टा लागेल असं वागणार नाही. मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. जितना बदल सकते थे खुद को बदल दिया हमने. अब जिनको शिकायत हे वह खुद को बदले असंही त्यांनी म्हटलं.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा