मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kandivali: कांदिवलीत अनैतिक संबंधातून भयानक कांड; उत्तर प्रदेशातून येऊन प्रेयसीच्या पतीचा काढला काटा

Kandivali: कांदिवलीत अनैतिक संबंधातून भयानक कांड; उत्तर प्रदेशातून येऊन प्रेयसीच्या पतीचा काढला काटा

May 31, 2023, 10:28 AM IST

  • Kandivali Crime: कांदिवलीत अनैतिक संबंधातून एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Representative use (HT_PRINT)

Kandivali Crime: कांदिवलीत अनैतिक संबंधातून एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

  • Kandivali Crime: कांदिवलीत अनैतिक संबंधातून एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Mumbai Police: कांदिवलीत दिवसाढवळ्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी कांदिवलीतील एकतानगर महिला आधार केंद्राजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. मृताच्या पत्नी आणि आरोपी यांच्यात संबंध होते. याच संबंधातून आरोपीने उत्तर प्रदेशातून मुंबईत आल्यानंतर तिच्या पतीची हत्या केली. आरोपीला लोकल कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Pune Lohegaon News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

मनोज चौहान असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनोजच्या पत्नी आणि दोन मुले उत्तर प्रदेशात राहतात. तिचे या गावात राहणाऱ्या रोहित पाल (वय, २३) याच्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती मनोजला समजल्यानंतर त्यांच्यात प्रचंड वाद झाला. यानंतर मनोज मुंबईत आला. येत्या २ जूनला मनोज पुन्हा उत्तर प्रदेशात जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच रोहितने मुंबईत येऊन त्याची गोळ्या झाडून मनोजची हत्या केली आणि उत्तर प्रदेशात पळून गेला. ही माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने रोहितला प्रयागराज रेल्वे स्थानकातून अटक केली.

याप्रकरणी पोलीस रोहितची कसून चौकशी करत आहेत. या हत्येत मनोजच्या पत्नीचा सहभाग आहे का? याचाही पोलीस शोध घेत आहेत. लवकरच तिची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीनंतर पोलीस पुढील कारवाईला सुरुवात करणार आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा