मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalna: नवजात लेकीला पाहण्यासाठी आलेल्या जवानावर काळाचा घाला; रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू

Jalna: नवजात लेकीला पाहण्यासाठी आलेल्या जवानावर काळाचा घाला; रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू

Mar 14, 2023, 09:48 AM IST

  • Jalna Shocking: नवजात लेकीला पाहण्यासाठी आलेल्या जवानाचा रेल्वेतून खाली पडल्याने दुर्देवी अंत झाला आहे.

Death (Representative Image)

Jalna Shocking: नवजात लेकीला पाहण्यासाठी आलेल्या जवानाचा रेल्वेतून खाली पडल्याने दुर्देवी अंत झाला आहे.

  • Jalna Shocking: नवजात लेकीला पाहण्यासाठी आलेल्या जवानाचा रेल्वेतून खाली पडल्याने दुर्देवी अंत झाला आहे.

Jalna News: जालन्यात नुकत्याच जन्माला आलेल्या आपल्या लेकीला पाहण्यासाठी आलेल्या जवानावर काळाने घाला घातला. आपल्या नवजात लेकीला पाहण्याच्या ओढीने जवान घाईघाईने आपल्या गावाकडे निघाले होते. मात्र, वाटेतच रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ICSE Result 2024 : ठाण्यातील रेहान सिंह बारावी ICSE बोर्डात भारतात पहिला, केवळ एका गुणाने हुकले १०० टक्के

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

राहुल ढगे असे या जवानाचे नाव आहे. राहुल दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २० मार्च २०१३ ला महार रेजिमेंटमध्ये सैन्य दलात भरती झाले. दरम्यान, रविवारी रात्री राहुल यांच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला. आपल्या नवजात मुलीला पाहण्यासाठी राहुल गावाकडे निघाले. मात्र, सोमवारी पहाटे रेल्वेतून खाली पडल्याने लेकीला पाहण्याआधीच त्यांचा दुर्देवी अंत झाला. याप्रकरणी जालना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यानंतर सोमवारी दुपारी राहुल ढगे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्य ताब्यात दिला. राहुल ढगे यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

राहुल ढगे यांना २० मार्च रोजी सैन्य दलात भरती होऊन दहा वर्षे पूर्ण होणार होती. १६ जुलै रोजी ते नगर येथे सातव्या महार बटालियनमध्ये बदलून आले होते. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. राहुल यांच्यावर वसमत तालुक्यातील पळशी या मूळ गावी आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा