मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nandgaon Car Accident : भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, चिमुकलीसह तिघांचा मृत्यू

Nandgaon Car Accident : भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, चिमुकलीसह तिघांचा मृत्यू

May 30, 2023, 08:37 AM IST

    • Nandgaon Car Accident : भरधाव कार पुलावरून खाली कोसळल्याची थरारक घटना समोर आली आहे. भीषण अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला असून सातजण जखमी झाले आहे.
Nandgaon Nashik Car Accident (HT)

Nandgaon Car Accident : भरधाव कार पुलावरून खाली कोसळल्याची थरारक घटना समोर आली आहे. भीषण अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला असून सातजण जखमी झाले आहे.

    • Nandgaon Car Accident : भरधाव कार पुलावरून खाली कोसळल्याची थरारक घटना समोर आली आहे. भीषण अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला असून सातजण जखमी झाले आहे.

Nandgaon Nashik Car Accident : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदगावच्या नाग्या-साक्या पुलावरून भरधाव कार खाली कोसळल्याने चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहे. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून त्यानंतर आता स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतांसह जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. याशिवाय अपघातग्रस्त कार पुलाखालून बाहेर काढण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. जखमींना मालेगावातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथून एक लग्नसोहळा आटोपून प्रवासी कारने नाशिकच्या दिशेने निघाले होते. परंतु नांदगावच्या रात्री एक वाजेच्या सुमारास नाग्या-साक्या धरणासमोरील कठडे नसलेल्या पुलावरून भरधाव कार खाली कोसळली. त्यामुळं कारमधील चार वर्षांच्या चिमुकलीसह अन्य तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याशिवाय सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. नाग्या-साक्या पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केलं. भीषण अपघाताची माहिती कळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

कार अपघातील जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे नांदगावातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मध्यरात्री चालकाला अचानक झोप लागल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज स्थानिक पोलिसांनी वर्तवला आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहराजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता नांदगावातील नाग्या-साक्या पुलावरून कार खाली कोसळल्याने चार लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा