मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Marathi News Updates 30 May 2023 Maharashtra Breaking News Live Updates Today

Live News Updates 30 May 2023(HT)

Live News Updates 30 May 2023 :लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर अब्दुल भुट्टावी याचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू

Abdul Salam Bhuttavi : लष्कर-ए-तैयबा (LeT) कमांडर आणि २००८ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणारा हाफिज सईदचा विश्वासू हस्तक अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झाला आहे.

Tue, 30 May 202302:52 PM IST

वीज वितरण कंपनीच्या ३ कोटी वीज ग्राहकांपैकी फक्त ५० टक्के ग्राहकांची योग्य बिलिंग

वीज वितरण कंपनीच्या ३ कोटी वीज ग्राहकांपैकी फक्त ५० टक्के ग्राहकांची योग्य बिलिंग होत आहे. १०० टक्के वीज ग्राहकांची अचूक बिलिंग झाल्यास महावितरण कंपनी जगातील सर्वात जास्त महसूल घेणारी कंपनी होईल. वीजग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासह महसूलवाढीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सुरळीत वीजपुरवठा, अचूक बिलिंग व वापरलेल्या प्रत्येक युनिटची वीजबिल वसुली केली तरच महावितरण प्रगतिपथावर जाईल. त्यासाठी महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी केले.

Tue, 30 May 202312:43 PM IST

एमपीएससी’ची दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारीपदाच्या ११४ जागांसाठी जाहिरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्यामार्फत दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) पदांच्या एकूण ११४ जागा भरण्यासाठी शनिवार ९ सप्टेंबर २०२३ रोजी औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर केंद्रांवर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२ ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Tue, 30 May 202312:01 PM IST

महावितरणचे मुख्य अभियंता ‍सचिन तालेवार यांची मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीच्या संचालकपदी निवड

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता ‍सचिन तालेवार यांची मध्य प्रदेश शासनाने मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीच्या संचालक (तांत्रिक) या पदी निवड झाली आहे. आज (मंगळवार) इंदूर येथे त्यांनी पदभार स्वीकारला.

Tue, 30 May 202310:52 AM IST

Closing bell  :  निर्देशांक वाढीसह बंद, मिडकॅप - स्माॅलकॅपमध्ये वाढ 

मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले. बीएसईचा ३० शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स १२२.७५ अंकांच्या म्हणजेच ०.२० टक्क्यांच्या वाढीसह ६२,९६९.१३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी ३५.२० अंकांच्या म्हणजेच ०.१९ टक्क्यांच्या वाढीसह १८,६३३.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीवर आयटीसीमध्ये सर्वाधिक २.३५ टक्क्यांची वाढ दिसून आली.

ऑटो, एनर्जी, फार्मा आणि मेटल क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. त्याचवेळी बँक, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी नोंदवण्यात आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाले.

Tue, 30 May 202309:36 AM IST

Modi @9 : भाजपची ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची योजना

मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपतर्फे देशभर महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.  या द्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अभियानात केंद्रीय मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी असे २२७ प्रमुख नेते लोकसभेच्या सर्व मतदारसंघात जातील, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी दिली.

Tue, 30 May 202308:47 AM IST

 Abdul Salam Bhuttavi : लश्कर-ए-तय्यबाचा कमांडर अब्दुल भुट्टावी याचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू

Abdul Salam Bhuttavi : लष्कर-ए-तैयबा (LeT) कमांडर आणि २००८ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणारा हाफिज सईदचा विश्वासू हस्तक अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झाला आहे. भुट्टावीला २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं दहशतवादी घोषित केलं होतं. काही वर्षांनंतर त्याला पाकिस्तानात अटक करण्यात आली. हाफिज सईदच्या मेहुण्यासोबत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल भुट्टावीला दोषी ठरवून १६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Tue, 30 May 202308:31 AM IST

बारामतीतून उड्डाण केलेल्या प्रशिक्षणार्थी विमानाचे बेळगावजवळ शेतात इनर्जंसी लँडिंग; पायलट किरकोळ जखमी

बारामती येथील ‘रेड बर्ड’ या पायलट प्रशिक्षण संस्थेच्या छोट्या विमानात तांत्रिक बिघाड उत्पन्न झाल्याने कर्नाटकातील बेळगावाजवळ एका शेतात इमर्जंसी लँडिंग करावे लागले. या घटनेत विमानातील दोन्ही पायलट किरकोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या हवाई दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बारामतीतून उड्डाण केलेल्या प्रशिक्षणार्थी विमानाचे बेळगावजवळ शेतात इनर्जंसी लँडिंग; पायलट किरकोळ जखमी
बारामतीतून उड्डाण केलेल्या प्रशिक्षणार्थी विमानाचे बेळगावजवळ शेतात इनर्जंसी लँडिंग; पायलट किरकोळ जखमी

Tue, 30 May 202307:00 AM IST

maratha reservation : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या हालचालींना वेग, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

maratha reservation : राज्यातील मराठा समाजाला इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ११ अधिकाऱ्यांची एक समिती नेमली आहे. ही समिती येत्या तीन महिन्यांत अहवाल जारी करणार आहे. त्यामुळं आता ऐन विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Tue, 30 May 202306:14 AM IST

Balu Dhanorkar : खासदार बाळू धानोरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

‘तळागाळापर्यंत पोहोचलेले उमदे, लढवय्ये नेतृत्व अकाली गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'पूर्वीचा एक सच्चा शिवसैनिक ते आमदार आणि खासदार म्हणून बाळू धानोरकर यांची वाटचाल जवळून पाहिली आहे. मतदारसंघातील विकास कामांसाठी त्यांचा सातत्यपूर्ण असा पाठपुरावा आणि धडपड असायची. नुकतंच त्यांचं पितृछत्र हरपलं होतं. त्यानंतर त्यांचं असं अकाली निधन त्यांच्या कुटुंबीयांसह, कार्यकर्त्यावर एक आघात आहे. धानोरकर कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Tue, 30 May 202303:49 AM IST

opening bell : सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात, निर्देशांकात संमिश्र स्थिती

सेन्सेक्सची सुरुवात आज घसरणीने झाली आहे. सेन्सेक्समध्ये सुरुवातीला ६.५३ अंशांची घट नोंदवत तो अंदाजे ६२,८३९.८५ अंशांवर खुला झाला. तर निफ्टीत ८ अंशांची वाढ झाली असून १८,६०६.६५ अंशांवर तो खुला झाला. तत्पुर्वी, सोमवारी सेन्सेक्सने ६३ हजारांची ऐतिहासिक अंश पातळी गाठली होती.

Tue, 30 May 202303:47 AM IST

Kashmir Bus Accident : काश्मिरमध्ये खाजगी बसला भीषण अपघात, १० भाविकांचा मृत्यू

Jammu Kashmir Bus Accident : अमृतसरहून काश्मिरमधील कटरा येथे जाणाऱ्या खाजगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात वैष्णो देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या १० भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. खोल दरीत बस कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.

Tue, 30 May 202312:20 AM IST

शिंदे-फडणवीस सरकार बळीराजाला गुडन्यूज देण्याच्या तयारीत, शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करणार

गेल्या दोन हंगामांपासून अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

Tue, 30 May 202312:19 AM IST

MPSC : खेळाडू असल्याचा खोटा दावा करणाऱ्या दोन उमेदवारांची निवड एमपीएससीकडून रद्द

MPSC Sports Reservation Quota : २०१९ च्या पीएसआय परिक्षेत खेळाडू असल्याचा खोटा दावा करत आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या दोन नायब तलसिलदारांची निवड एमपीएससीने रद्दबातल केली आहे. अनिल बाबुराव पाटील आणि जयश्री गोविंद नाईक अशी आरोपींची नावं आहे. एमपीएससीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दोषी उमेदवारांवर कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

Tue, 30 May 202312:19 AM IST

Balu Dhanorkar health updates : काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक

Balu Dhanorkar health updates : चंद्रपुरचे काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना दिल्लीतील वेदांता रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. किडनी खराब झाल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू होते. परंतु त्यांची प्रकृती सातत्याने खराब होत असल्याने त्यांना उपचारासाठी विमानाने दिल्लीत आणण्यात आलं आहे.

Tue, 30 May 202312:19 AM IST

maharashtra weather forecast : मराठवाड्यासह विदर्भात ४८ तासांत अवकाळी पावसाचा इशारा

maharashtra weather forecast : राज्यातील मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यापूर्वी पुणे, कोल्हापूर आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळं आता पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे बळीराजाची संकटात सापडण्याची चिन्हं आहे.

Tue, 30 May 202312:16 AM IST

Eknath Shinde : आपत्तीत तात्काळ बचावकार्य करणारी पथकं तयार करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

Eknath Shinde : राज्यात येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळं विविध नैसर्गिक आपत्तीविरुद्ध लढण्यासाठी तात्काळ बचावकार्य करणारी पथकं तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहे. त्यानंतर आता महानगरपालिका आणि मदत व पुनर्वसन विभागानेही बचाव दल स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. याशिवाय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा निधी प्रभावीपणे खर्च करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला केल्या आहे.