मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Balu Dhanorkar : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Balu Dhanorkar : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 30, 2023 09:05 AM IST

Balu Dhanorkar Passes Away : गेल्या अनेक दिवसांपासून खासदार बाळू धानोरकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

Congress MP Balu Dhanorkar Passes Away
Congress MP Balu Dhanorkar Passes Away (HT)

Congress MP Balu Dhanorkar Passes Away : काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं आज दिल्लीतील वेदांता रुग्णालयात निधन झालं आहे. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती बिघडल्याने काल सकाळी त्यांना नागपुरहून विशेष एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीतील वेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचं निकटवर्तीय तसेच कुटुंबियांनी वेदांता रुग्णालयात धाव घेत तब्येतीची माहिती घेतली होती. अखेर आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळं आता राज्यातील एकमेव काँग्रेस खासदाराचं निधन झाल्यामुळं महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर आता त्यांचं पार्थिव शरीर सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने चंद्रपुरात आणण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या दुपारी चंद्रपुरातील वरोरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच बाळू धानोरकर यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. परंतु आजारपणामुळं अंथरुणाला खिळलेल्या बाळू धानोरकर यांना वडिलांच्या अंत्यविधीला हजर राहता आलेलं नव्हतं. नागपुरातील अरिंहत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

बाळू धानोरकर हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. अनेक वर्ष ते शिवसेनेचे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चंद्रपुरातील वरोरा विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यानंतर बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी भाजपचे नेते आणि तात्कालीन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. २०१९ साली राज्यात काँग्रेसची वाताहत होत असताना बाळू धानोरकर यांनी चंद्रपुरात काँग्रेसचा मोठं यश मिळवून दिलं होतं.

IPL_Entry_Point