मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर, दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास खलबतं

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर, दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास खलबतं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 30, 2023 12:17 AM IST

Maharashtra Politics :आज अचानकउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील भेटीने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष नाट्याचा धुरळा आता खाली बसला असताना आज अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील भेटीने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली.

सोमवारी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? व या भेटीचा उद्देश्य काय, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. या भेटीचं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. पण या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपमध्ये काही मुद्द्यांवरून खटके उडाले आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

कर्नाटक निवडणुकीनंतर राज ठाकरे व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात शाब्दिक चकमक रंगली होती.

दोन हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मोदींवर जोरदार टीका केली होती. जर तज्ज्ञांशी बोलून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळच आली नसती, असं राज ठाकरे म्हणाले.

 

त्यावर आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला देत म्हटले होते की, राज ठाकरे यांना आमचं निवेदन आहे की तुम्ही उत्तम नेते आहात, अभ्यास करता पण सर्व विषयावर बोललं पाहिजे असं नाही. तुम्ही व्यक्तिगत माझ्यावर बोलाल तर ठीक आहे. पण तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्यांवर बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही.

IPL_Entry_Point