मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kankavli accident : मुंबई-गोवा हायवेवर दुसरा भीषण अपघात, खासगी बस उलटून ४ ठार, २३ जखमी

Kankavli accident : मुंबई-गोवा हायवेवर दुसरा भीषण अपघात, खासगी बस उलटून ४ ठार, २३ जखमी

Jan 19, 2023, 10:03 AM IST

  • Mumbai Goa highway accident near Kankavli : मुंबई-गोवा महामार्गावर आज दोन अपघातात झाले यात १३ जणांचा मृत्यू झाला. पहिला अपघात हा पहाटे ४ वाजता कणकवली येथे झाला. यात चौघांचा मृत्यू झाला तर दूसरा अपघात हा रायगडजवळील रेपोली जवळ झाला यात ९ जणांचा मृत्यू झाला.

Mumbai-Goa highway accident

Mumbai Goa highway accident near Kankavli : मुंबई-गोवा महामार्गावर आज दोन अपघातात झाले यात १३ जणांचा मृत्यू झाला. पहिला अपघात हा पहाटे ४ वाजता कणकवली येथे झाला. यात चौघांचा मृत्यू झाला तर दूसरा अपघात हा रायगडजवळील रेपोली जवळ झाला यात ९ जणांचा मृत्यू झाला.

  • Mumbai Goa highway accident near Kankavli : मुंबई-गोवा महामार्गावर आज दोन अपघातात झाले यात १३ जणांचा मृत्यू झाला. पहिला अपघात हा पहाटे ४ वाजता कणकवली येथे झाला. यात चौघांचा मृत्यू झाला तर दूसरा अपघात हा रायगडजवळील रेपोली जवळ झाला यात ९ जणांचा मृत्यू झाला.

Mumbai Goa highway bus accident News Today : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटेच्या ४ च्या सुमारास कणकवली जवळ एक खासगी बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर तब्बल २३ प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Lohagav News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

  शैलजा प्रेमानंद माजी (५६ दोडामार्ग) व अण्णा गोविंद नाले (५२ सातारा) अशी मृतांची नावे असून दुसऱ्या दोघांची नावे समजू शकली नाही.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याहून येणारी एक खासगी ही गडनदी पूलावर धोकादायक वळणावर आली असता बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तब्बल ३० जण जखमी झाले आहेत. यातील १० जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पुण्याहून गोव्याकडे जाणारी खासगी बसही गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास हळवल फाटा येथे आली असता चालकाचे बस वरील नियंत्रन सुटले. यामुळे ही बस पालटली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती बर्गे, पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील, किरण मेथे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येत त्यांनी जखमींना गाडीतून बाहेर काढले. त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा